Varun Dhawan Birthday special story varun dhawan natasha dalal love story sakal
मनोरंजन

Varun Dhawan Birthday: वरुण प्रपोज करत होता अन् नताशा भाव खात होती.. भन्नाट आहे दोघांची लव्हस्टोरी

अभिनेता वरुण धवनचा आज वाढदिवस, त्या निमित्ताने ही खास बात...

नीलेश अडसूळ

Varun Dhawan Birthday: बॉलीवूडमध्ये अल्पावधीतच आपल्या अभिनयानं सर्वांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणून वरुण धवनचे नाव घ्यावे लागेल. त्यानं आपल्या अभिनयानं मोठा चाहतावर्ग तयार केला आहे.

सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह (active on social media) असणारा वरुण चाहत्यांच्या कायमच जवळ राहीलेला आहे. त्यामुळे आज त्याच्या वाढदिवासा निमित्त सर्व चाहते त्याला भरभरून शुभेच्छा देत आहेत.

आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याची फिल्मी लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत. वरुणने दोन वर्षांपूर्वी आपल्या मैत्रिणी सोबत म्हणजे नताशा दलाल सोबत लग्नगाठ बांधली पण त्यांची लव्हस्टोरी अगदी भन्नाट आहे तीच आज जाणून घेऊया..

(Varun Dhawan Birthday special story varun dhawan natasha dalal love story)

ज्याच्या प्रेमात असंख्य तरुणी आहेत असा वरुण मात्र एकच तरुणीसाठी वेडा होता. ती म्हणजे त्याची बाल मैत्रीण नताशा. आज मनोरंजन विश्वात काम करताना वरुणला सहज कुणीही अभिनेत्री होकार देऊ शकली असती, पण वरुण मात्र नताशाशीच लग्न करण्यावर ठाम होता.

लहानपणापासूनच वरुण नताशाच्या प्रेमात वेडा होता आणि त्याला फक्त तिच्याशीच लग्न करायचे होते. पण नताशाची समजूत काढण्यासाठी वरुणला खूप संघर्ष करावा लागला आणि त्याला चार वेळा नकारही मिळाला. अशी त्यांनी भन्नाट लव्हस्टोरी आहे.

त्यांच्या नात्या विषयी एका मुलाखतीत वरुण म्हणाला होता, 'जेव्हा मी नताशाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी सहावी मध्ये होतो. पण त्यानंतर आम्ही एकमेकांना डेट केले नाही आणि १२ वीपर्यंत आम्ही चांगले मित्र होतो. '

'पण आजही मला तो दिवस आठवतो, मी अकरावी-बारावीत असेन. मी यलो हाऊसमध्ये होतो आणि तो रेड हाऊसमध्ये होती. आम्ही बास्केटबॉल कोर्टवर होतो. ती माझ्या समोर येत होती आणि फक्त तिला पाहून मला पहिल्या नजरेतच कळले की मी नताशाच्या प्रेमात आहे.'

'यानंतर मी माझ्या मनाचे ऐकले आणि नताशाला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. पण काही घडले नाही आणि नताशाने माझा प्रपोजल चार वेळा नाकारला. वरुण नताशाकडे प्रेम व्यक्त करण्याचा वारंवार प्रयत्न करत होता, शेवटी तिनेही होकार दिला. यानंतर वरुण आणि नताशाने काही काळ एकमेकांना डेट केले. त्याच वेळी, 24 जानेवारी 2021 रोजी दोघांनी लग्न केले आणि आता ते त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. नताशा एक फॅशन डिझायनर आहे आणि तिला लाइमलाइटमध्ये राहणे आवडत नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT