varun dhawan jhanvi kapoor  Sakal
मनोरंजन

Bawaal Release Date: वरूण धवन-जान्हवी कपूरचा 'बवाल' या दिवशी थिएटरमध्ये होणार दाखल, रिलीज डेट जाहीर

जान्हवी कपूर आणि वरुण धवनची नवीन जोडी रोमँटिक पीरियड अ‍ॅक्शन-ड्रामा 'बवाल'मध्ये दिसणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'बवाल'ची वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चित्रपट निर्मात्याने त्याच्या आगामी प्रोजेक्ट 'बवाल'ची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी ट्विट करून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती दिली आहे.

'छिछोरे'सारखा यशस्वी चित्रपट दिल्यानंतर साजिद नाडियादवाला आणि नितेश तिवारीची जोडी पुन्हा एकदा 'बवाल' घेऊन येत आहे. त्याला 'छिछोरे'साठी सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे, तर निर्मात्यांनी 'बवाल'च्या रिलीज तारखेबाबत ट्विटरवर पोस्ट केले आहे, "राष्ट्रीय पुरस्कार विजेते साजिद नाडियादवाला आणि नितेश तिवारी 'बवाल'सोबत परतले आहेत. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी तुमच्‍या जवळच्‍या चित्रपटगृहांमध्‍ये त्‍यांची एपिक क्रिएकशन पहा! स्टारिंग वरुण धवन आणि जान्हवी कपूर."

जान्हवी कपूर आणि वरुण धवनची नवीन जोडी रोमँटिक पीरियड अॅक्शन-ड्रामा 'बवाल'मध्ये दिसणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 7 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार असल्याचे सांगण्यात आले होते परंतु VFX समस्यांमुळे ही रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

हा चित्रपट वरुण धवनच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. नाडियाडवाला ग्रॅंडसनच्या बॅनरखाली साजिद नाडियादवाला यांनी 'बवाल'ची निर्मिती केली आहे आणि अर्थस्काय पिक्चर्सची सह-निर्मिती आहे.

'बवाल' ही प्रेमकथा सांगितली जात आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एप्रिलमध्ये हा चित्रपट फ्लोरवर गेला होता. पॅरिस, बर्लिन, पोलंड, अॅमस्टरडॅम, क्राको, वॉर्सा तसेच भारतातही त्याचे चित्रीकरण झाले. आणि एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, चित्रपटाचे अॅक्शन डायरेक्टर आणि स्टंटमॅन यांना जर्मनीतून नेमण्यात आले होते. चित्रपटाच्या क्रूमध्ये 700 हून अधिक लोक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 5th Test: भारताचे जबरदस्त कमबॅक! मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णाच्या तिखट माऱ्यानंतर यशस्वी जैस्वालचा प्रहार

Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या नातवाने केले शेकडो महिलांचे लैंगिक शोषण; हजारो अश्लील व्हिडिओ, कोर्ट उद्या सुनावणार शिक्षा

IND vs ENG 5th Test: तू आम्हाला गप्प बसायला काय सांगतोस? KL Rahul भर मैदानात अम्पायरला भिडला! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट यांच्या वादात उडी Video Viral

Onion Rate Decrease : कांदा दर घसरले! शेतकरी अडचणीत; साठवणुकीवर दिला जातोय भर

Mumbai News : योगेश कदम यांच्याकडून ‘सावली बार’ ऑर्केस्ट्राचा परवाना परत

SCROLL FOR NEXT