varun dhawan to knot tie with girlfriend natasha dalal  
मनोरंजन

वरुण धवनचं यंदा कर्तव्य आहे, 'या' ठिकाणी करणार लग्न

वृत्तसंस्था

मुंबई : वरुण धवन हा दिग्दर्शक डेविड धवन यांचा मुलगा आहे. पण, मे़हनतीने आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावलं आहे. करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ दि इयर' या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. वरुण य़ावर्षी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत  लग्नबंधनात अडकणार आहे. जाणून घ्या कोण आहे त्याची गर्लफ्रेंड आणि कोणत्या डेस्टिनेशनवर वरुण लग्न करणार आहे. 

हजारो मुलींचं दिल तोडत वरुण अखेर लग्न करणार असल्याची चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये सुरु आहे. वरुण धवन त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्न करणार आहे. खरंतर वरुण आणि नताशा मागिल वर्षी 2019 मध्येच लग्न करणार होते पण, चित्रपटाच्या शुटिंगमुळे लग्नाची तारीख पुढे गेल्याचे समजते. वरुणच्या लग्नापासून ते हनिमुनपर्यंत सर्व गोष्टींचे नियोजन झाले आहे. 

रिपोर्टच्या माहितीनुसार नताशा आणि वरुण उन्हाळ्यातच लग्न करणार आहेत. वरुणचा वाढदिवस 24 एप्रिलला असतो आणि त्यादिवशी लग्नाच्या तारखेची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लग्नाचं स्थळ गोवा असणार आहे. 

वरुण सध्या 'स्ट्रीट डांसर 3D' मध्ये व्य़स्त आहे. त्याने शशांक खेतान यांचा 'मिस्टर लेले' हा चित्रपटही साइन केला आहे. शिवाय त्याचा आगामी चित्रपट 'कुली नंबर 1'चं शुटींगही पूर्ण झालं आहे. त्यामुळे लग्नासाठी त्याने संपूर्ण नियोजन केलं असल्याचे समजते.

कोण आहे नताशा  ?
वरुण धवनच्या होणाऱ्या बायकोचं नाव आहे नताशा दलाल. 16 मार्च 1989 ला नताशाचा जन्म मुंबईतला झाला. तिचे वडिल बिझनेसमॅन आहेत. तिच्या वडिलाचं नाव आहे राजेश दलाल तर आईचं नाव गौरी दलाल असं आहे. वरुण आणि नताशा एकमेकांना खूप आधीपासून ओळखतात. नताशाने फॅशन डिझायनिंगमध्ये 2013 मध्ये फॅशन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी न्यूयॉर्क मधून शिक्षण घेतलं आहे. सध्या डिझायनिंग क्षेत्रातच ती काम करत आहे. तिचा स्वत:ला फॅशन ब्रॅंडही आहे. 

नताशा आणि वरुण शाऴेपासून एकमेकांना ओळखतात. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये वरुणने नताशा आणि त्याच्या नात्याची कबुली दिली होती. लग्न् करणार असल्याचंही त्याने सांगितलं. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

मोठी बातमी! इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी नवे नियम लागू; महायुती सरकारने वयाची अट बदलली, आता किती वर्षाच्या मुलांना प्रवेश मिळणार?

Latest Marathi News Live Update : डीजे नाही, तर हातात झाडू घेऊन साजरी केली शिवजयंती...

Rohit Mhaishale Case Sangli : सांगलीत लपला होता रोहित म्हैशाळे हत्याकांडाचा 'मास्टरमाइंड'; कोण आहे 'गोट्या'? त्याचा दलित महासंघाच्या नेत्याच्या खुनाशीही संबंध?

Horoscope : उद्या ८ मार्च! 'या' ५ राशींच्या लोकांना धनलाभ योग; नव्या आठवड्याच्या सुरुवातीला मिळेल खुशखबर, जुना त्रास होणार दूर

SCROLL FOR NEXT