varun dhawan Sakal
मनोरंजन

Varun Dhawan: 'झी सिने अवॉर्ड्स 2023' होस्ट करण्यासाठी वरुणने दिली होती मोठी रक्कम, ऐकून बसेल धक्का

वरुण धवनही काही काळ होस्टची जबाबदारी सांभाळताना दिसला. आता याबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.

Aishwarya Musale

झी सिने अवॉर्ड्स 2023 चे प्रसारण गेल्या महिन्यात म्हणजेच 18 मार्च रोजी झाले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्टार्सना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी अवॉर्ड देण्यात आले. झी सिनेतर्फे सर्वोत्कृष्ट चित्रपट, स्टार्सचा सत्कार करण्यात आला. त्याच वेळी, हा अवॉर्ड शो आयुष्मान खुराना आणि अभिनेता-भाऊ अपारशक्ती खुराना यांनी होस्ट केला होता. यादरम्यान वरुण धवनही काही काळ होस्टची जबाबदारी सांभाळताना दिसला. आता याबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.

आलिया भट्ट, रश्मिका मंदान्ना, पूजा हेगडे, कियारा अडवाणी, कार्तिक आर्यन, टायगर श्रॉफ, वरुण धवन आणि शाहिद कपूर सारखे स्टार्स 'झी सिने अवॉर्ड्स 2023' मध्ये सहभागी होताना दिसले. दुसरीकडे, वरुण धवन त्याच्या मागील 'भेडिया' या चित्रपटातील 'जंगल में कांड' आणि 'अपना बना ले' या दोन गाण्यांवर दमदार परफॉर्मन्स देताना दिसला. इतकंच नाही तर काही काळासाठी तो शो अधिक रंजक बनवण्यासाठी होस्ट करताना दिसला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना वरुण धवनने आयुष्मान खुरानासोबत खूप मस्ती केली. आयुष्मान-वरूणने एकत्र 'ब्रह्मास्त्र'मधील आलिया भट्टच्या 'केसरिया' या हिट गाण्याचे विडंबन गायले आणि अभिनेत्रीसोबत खूप मस्ती केली.

वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच नितेश तिवारीच्या 'बवाल' चित्रपटात जान्हवी कपूरसोबत दिसणार आहे. अभिनेता 'सिटाडेल'च्या हिंदी आवृत्तीसाठी देखील चर्चेत आहे. राज आणि डीके दिग्दर्शित, या शोमध्ये सामंथा रुथ प्रभू देखील प्रमुख भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT