Dulhania 3  Esakal
मनोरंजन

Dulhania 3: 'हम्प्टी शर्मा' अन् 'बद्रीनाथ' नंतरही वरुन धवन अजून 'दुल्हनिया 3'च्या शोधातच! मात्र यावेळी नवरी बदलणार?

पुन्हा एकदा वरुण 'दुल्हन' फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे.

Vaishali Patil

Dulhania 3: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. नुकतच त्याच्या पायाला दुखापत झाली होती. तो VD18 चित्रपटाची शुटिंग करत असताना तिसऱ्यांदा त्याचा अपघात झाला आहे. वरुणने आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

वरुण धवनच्या 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' सारख्या रोमँटिक कॉमेडींद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

तर आता पुन्हा एकदा वरुण 'दुल्हन' फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. आता वरुणने दुल्हनिया फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागासाठी दिग्दर्शक शशांक खेतानसोबत बोलणी सुरु केली आहेत.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, वरुण धवन स्टारर चित्रपट 'दुल्हनिया 3' ची शूटिंग 2024 च्या अखेरीस सुरू होणार आहे. तर वरूण, शशांक आणि करण जोहर यांनी ‘दुल्हनिया 3’ साठी चर्चा केली आणि स्टोरी फानयल केली आहे. 2024 च्या अखेरीस हा चित्रपट येण्यासाठी सज्ज आहे.

मात्र यावेळी आलिया भट्ट 'दुल्हनिया'च्या तिसऱ्या भागात काम करणार नाही. तिला या फ्रँचायझीतून काढून टाकण्यात आले आहे. खरं तर, करण जोहर या चित्रपटात वरुणच्या बरोबर एका नवीन चेहऱ्याला संधी देणार आहे. निर्मात्यांनी दुल्हनियाच्या भूमिकेसाठी नवीन अभिनेत्रीचा शोध सुरू केला आहे.

'दुल्हनिया' फ्रँचायझीच्या दोन्ही चित्रपटात आलिया भट्ट आणि वरुण धवन दिसले होते. 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया'ची निर्मिती करणच्या धर्मा प्रोडक्शन कंपनीने केली होती. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर खुप गाजले.

पहिल्या चित्रपटाने जवळपास 120 कोटी कोटी तर दुसऱ्या चित्रपटाने 200 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे आता 'दुल्हनिया 3' किती कोटींची कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT