Varun Sood  
मनोरंजन

Khatron Ke Khiladi 11: स्टंट करताना वरुण सूद जखमी; सेटवर मोठी दुर्घटना

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये सुरू आहे शूटिंग

स्वाती वेमूल

'खतरों के खिलाडी ११'च्या Khatron Ke Khiladi 11 शूटिंगदरम्यान स्पर्धक आणि अभिनेता वरुण सूदला Varun Sood मोठी दुखापत झाली. धोकादायक स्टंटचं शूटिंग करताना वरुणचा तोल ढासळला आणि तो जखमी झाला. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये सध्या या रिअॅलिटी शोचं शूटिंग सुरू आहे. शोमधील सर्व स्टंट्स हे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आणि संपूर्ण सुरक्षेचे नियम पाळून केले जातात. मात्र तरीही प्रत्येक सिझनमध्ये कोणी ना कोणी स्पर्धक जखमी झाल्याचं कळतं. 'ई टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, तीन-चार दिवसांपूर्वी शूटिंग करताना वरुण जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. (Varun Sood injured on the sets of Khatron Ke Khiladi 11 rushed to hospital)

वरुणच्या हाताला दुखापत झाली होती. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र शोच्या टीमकडून त्याला दोन-तीन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला. वरुणने याआधी 'रोडीज' आणि 'स्प्लिट्सविला' यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.

'खतरों के खिलाडी'च्या अकराव्या सिझनचं सूत्रसंचालन दिग्दर्शक रोहित शेट्टी करत आहे. काही दिवसांपूर्वीच या शोचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये रोहित शेट्टीसुद्धा स्टंट करताना दिसला होता. सध्याच्या सिझनमध्ये वरुणसोबतच श्वेता तिवारी, दिव्यांका त्रिपाठी, अर्जुन बिजलानी, निक्की तांबोळी, आस्था गिल, अनुष्का सेन, महीक चहल, राहुल वैद्य, अभिनव शुक्ला, विशाल आदित्य सिंग, सौरभ राज यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

Pune Fraud : अघोरी विधीच्या नावाखाली पुण्यात तरुणीची सव्वातीन लाखांची फसवणूक

Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT