varun tej lavanya tripathi wedding in italy photo and videos viral allu arjun ram charan attend  SAKAL
मनोरंजन

Varun - Lavanya Wedding: इटलीत शानदार पद्धतीने झालं वरुण - लावण्याचं लग्न, साऊथ सुपरस्टार्सच्या उपस्थितीने सोहळ्यात रंगत

वरुण तेज आणि लावण्या लग्नबंधनात अडकले आहेत

Devendra Jadhav

Varun Tej Wedding: गेल्या अनेक दिवसांपासुन वरुण तेज - लावण्या त्रिपाठी यांच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. वरुण - लावण्या यांच्या लग्नविधींचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

अशातच वरुण तेज - लावण्या यांचं लग्न अखेर शानदार पद्धतीने पार पडलं. या दोघांच्या लग्नाला अल्लु अर्जुनपासुन ते रामचरण पर्यंत अनेक सुपरस्टार्स उपस्थित होते.

वरुण - लावण्या अखेर लग्नबंधनात

वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी बुधवारी १ ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

इटलीतील सॅन फेलिस येथे पार पडलेल्या या दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. वरुण - लावण्या यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

लग्नासाठी, वरुणने सोनेरी शेरवानी आणि त्यावर एक मॅचिंग शाल परिधान केली होती. तर लावण्याने लाल रंगाचा पोशाख परिधान करुन लग्नाचा लुक केला होता. या दोघांनी सोन्याचे दागिने परिधान केले होते. दोघांचा जोडा अगदी शोभुन दिसत होता. या दोघांच्या फोटोंवर त्यांच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला

वरुण तेज हा ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी आणि पवन कल्याण यांचा भाचा आहे. अभिनेता राम चरण, अल्लू अर्जुन, अल्लू सिरिश, साई तेज आणि पंजा वैष्णव तेज हे सर्व त्याचे चुलत भाऊ आहेत.

तेजच्या लग्नात हे सर्व सामील झाले होते. नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन करताना चिरंजीवीने लग्नाचा एक फोटो X वर देखील शेअर केला.

वरुण आणि लावण्याचे इटलीतील लग्नाचे फोटोही समोर आले आहेत. लग्न समारंभातील एका फोटोमध्ये ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी आणि पत्नी सुरेखा दिसत आहेत. याशिवाय अभिनेता अल्लू अर्जुन देखील लग्न समारंभात धम्माल करताना दिसतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT