ved movie, ved movie box office collection,  SAKAL
मनोरंजन

Ved Movie Box Office Collection: वाह रे विक्रम.. वेड ची ८० कोटी कडे रेकॉर्डतोड घोडदौड...

रितेश व जिनिलीयाच्या 'वेड' बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे

Devendra Jadhav

Ved Movie Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा 'वेड' हा सिनेमा ३० डिसेंबरला रिलीज झाला. रितेशचा दिग्दर्शक म्हणून तर जिनिलियाचा अभिनेत्री म्हणून मराठीतला हा पहिलाच सिनेमा आहे. रितेश व जिनिलीयाच्या 'वेड' बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. वेडने रेकॉर्डतोड कमाई करत सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

वेड आता थेट ८० कोटींच्या घरात जाणार आहे. वेडने आजवर ७० कोटींची कमाई केली आहे. वेडने जगभरातून ७० कोटींची विक्रमी कमाई केली आहे. त्यामुळे रितेशचा वेड सिनेमा मालामाल झाला असून तो लवकरच १०० कोटींच्या क्लब मध्ये जाईल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. वेड ची आता पाचव्या आठवड्यात दमदार एंट्री झाली आहे. वेडने पाचव्या आठवड्यातल्या शुक्रवारी तब्बल ५७ कोटी रुपये कमावले आहेत.

वेड ने आतापर्यंत जगभरातून ७०. ९० कोटीची कमाई केली आहे. तर भारतात वेडने ५८. ११ कोटी इतकी भरघोस कमाई केली आहे. रितेशने यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत "तुमच्या प्रेमाचे आभार, मी तुमचा कायम ऋणी आहे" अशी पोस्ट शेयर केली आहे.

पहिल्या दिवसापासूनच 'वेड'नं बॉक्स ऑफिसवर त्याची घट्ट पकड निर्माण केली होती. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला. त्यानंतर पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने ४० कोटींचा टप्पा पार केला आणि तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने तब्बल ५० कोटींची कमाई केली.

'वेड' हा सिनेमा नागा चैतन्य आणि सामंथा यांच्या 'मजिली' या तेलुगू सिनेमावर आधारित आहे. वेड जरी रिमेक नसला तरीही रितेश आणि जिनिलियाचा जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे‌. वेड सिनेमात रितेश - जिनिलिया सोबत वेड मध्ये जिया शंकर, अशोक सराफ, विद्याधर जोशी अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुपरस्टार सलमान खानचं विशेष गाणं सिनेमात भाव खाऊन जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT