Ved Movie Song Release,genelia d'souza Deshmukh look cute in besuri song... Esakal
मनोरंजन

Ved Movie Song: दोन वेण्या, सालस लूक, शाळकरी मुलीच्या भूमिकेत जिनिलिया; 'Besuri' गाणं ऐकून पोरं प्रेमात

बेसुरी गाण्यात दिसलेल्या जिनिलिया आणि रितेशनं त्यांच्या पहिल्या सिनेमाची आठवण करुन दिली ते त्यांच्या लूकमुळे.

प्रणाली मोरे

Ved Movie: रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' सिनेमाच्या गाण्यांनी सध्या सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातलेला दिसत आहेत. सिनेमातील पहिलं गाणं 'वेड तुझा' रिलीज झालं तेव्हा जितकी क्रेझ तरुणाई मध्ये पहायला मिळाली, तेवढाच उत्साह सिनेमातील दुसरं गाणं 'बेसुरी; रिलीज झालं तेव्हा पहायला मिळाला. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या 'वेड' सिनेमाची उत्स्कुता सर्वत्र वाढली आहे . IMDB या साईट वर मोस्ट ऍंटीसिपेटेड फिल्म म्हणून पहिल्या क्रमांकावर फिल्म ट्रेंड होत आहे. (Ved Movie Song Release,genelia d'souza Deshmukh look cute in besuri song...)

'वेड' च्या निर्मात्यांनी ' बेसुरी' हे गीत आज प्रदर्शित केले आहे . हे गीत वसुंधरा वी यांनी गायले आहे आणि अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे . या गाण्यात रितेश आणि जिनिलिया शाळकरी मुलांच्या लूकमध्ये दिसत आहेत. जिनिलियानं तर काळ्या रिबिनीनं घट्ट बांधलेल्या दोन वेण्यांमध्ये काळीज चोरलं आहे.

तसंही जिनिलियानं आतापर्यंतच्या सर्वच सिनेमातून तिच्या सालस रुपानं अनेकांना घायाळ केलं होतं. आता पुन्हा एकदा जिनिलिया 'वेड' सिनेमातून तो सालस रंग आपल्या चाहत्यांसाठी घेऊन येतेय. 'बेसुरी' गाण्याचे सूर जितके मनाला भिडत आहेत तितकंच जिनिलियाचं रुप. रितेशही वयाची पंचेचाळीशी ओलांडली असली तरी शाळकरी मुलाच्या भूमिकेत शोभून दिसला आहे.

हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

मुंबई फिल्म कंपनीने "देश म्यूजिक“ लेबल द्वारे हे गीत प्रकाशित केले आहे. वेड सिनेमाला अजय अतुलचं संगीत असल्यानं सुरांची मेजवानी असली तर नवल नव्हे. सध्या 'वेड' सिनेमाच्या संगीतावर चाहते भूललेयत अन् सिनेमा रिलीज व्हायची प्रतिक्षा करू लागलेयत एवढं मात्र खरं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईकरांचा थरकाप! पावसात ठप्प लोकल, मध्य रेल्वे ३० मिनिटे लेट; ठाणे-कल्याणमध्ये जीव धोक्यात टाकून प्रवास

Buldhana News: जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध धंद्यांना ऊत; वाळू माफिया आणि अवैध उत्खनन जोमातः पोलिस आणि महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

Washim News: सावधान, आता शालेय बस वाहतुकीसाठी नवे नियम; सुरक्षितता व शुल्क नियंत्रणावर भर; पालकांना मिळणार दिलासा

Akola News: नांदेड–आसनसोल उन्हाळी विशेष रेल्वेगाडी अकोला थांबणार; प्रवाशांसाठी सोयीसुविधा

Latest Marathi News Live Update : जोगेश्वरीतील ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात कंत्राटी कामगारांचा बेमुदत संप

SCROLL FOR NEXT