Ved Movie: ' Ved Lavlay Song', Salman Khan Special song in Ved Marathi Movie  Esakal
मनोरंजन

Riteish Deshmukh Birthday: 'भाऊचा बर्थ डे मग तर...', रितेशच्या वाढदिवशी सलमानची स्पेशल पोस्ट चर्चेत

सलमाननं रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक सरप्राइज व्हिडीओ पोस्ट केलाय ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

Ved: रितेश देशमुख आणि जेनेलियाचा बहुचर्चित 'वेड' सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येत आहे. सध्या सिनेमाचं प्रमोशन रितेश आणि जेनेलिया एकदम जोरदार करताना दिसत आहेत. 'वेड' सिनेमाच्या माध्यमातून रितेश आणि जेनेलिया हे रीअल लाइफ कपल अनेक वर्षांनी एकत्र सिनेमात दिसणार आहेत,आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते एका मराठी सिनेमात एकत्र मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहेत. (Ved Movie: ' Ved Lavlay Song', Salman Khan Special song in Ved Marathi Movie )

सिनेमाच्या आतापर्यंत रिलीज झालेल्या गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलंच होतं त्यात नुकत्याच रिलीज झालेल्या टीझरनेही सिनेमाची उत्सुकता वाढवली आहे. आता सिनेमातलं नवं गाणं ते देखील सलमानचं समोर आल्यानं दबंग खानचा स्वॅग पाहून प्रेक्षक दंग होऊन गेलेयत. चर्चा तर गाण्याची होतीच,पण भाईचा 'भाऊ' अंदाज सगळ्यांनाच भावलाय हे गाणं पाहून. स्वतः सलमानने आपल्या इन्स्टावर रितेशच्या सिनेमातील त्या गाण्याला शेअर करत,रितेशला वाढदिवसाचं अनोख गिफ्ट देत शुभेच्छाही दिल्या आहेत.

रितेशच्या 'वेड' सिनेमातील नव्या रिलीज झालेल्या सलमानच्या गाण्याचे बोल आहेत, 'वेड लावलंय...', यामध्ये सलमान आणि रितेश बेभान होऊन नाचताना दिसत आहेत. सलमान या गाण्यातही काहीसा रावडी अंदाजात दिसला. पण यावेळी भाईगिरीचा नाही तर भाऊगिरीचा स्पेशल टच सलमानला या गाण्यातून दिलेला दिसला. या गाण्यातून सलमानची आणखी एक हूक स्टेप गाजणार एवढं मात्र नक्की. सध्या गाण्याच्या व्हिडीओवर सलमानचे चाहते मात्र भलतेच फिदा दिसतायत. अर्थात तसं त्याच्या अनेक चाहत्यांच्या कमेंट्सवरनं लक्षात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्ह संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

Atiq Ahmed Son Accident Video: अतिक अहमदच्या मुलाचा अपघात कसा झाला? कार डिव्हायडरला धडकली अन् हवेत उडाली, Live Video Viral

Scam 2010 Marathi Actor: SCAM 2010 मध्ये झळकणार मराठमोळा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला? पत्नी गाजवतेय मराठी मालिका

YCMOU Exam: धक्कादायक! एकाच विद्यार्थ्याने एकाच वेळी दिल्या दोन परीक्षा, 'मुक्त'च्या परीक्षेत ४० जणांचा प्रताप; विद्यापीठाकडून दखल

Ethanol Production Restrictions: उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध?; साखरेचे भाव नियंत्रणासाठी उत्पादन वाढविणार

SCROLL FOR NEXT