veteran actress bhairavi vaidya passed away at th age of 45 work with aishwarya rai bachchan in taal movie SAKAL
मनोरंजन

Bhairavi Vaidya: ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचं निधन, ऐश्वर्या राय सोबत गाजवलेला हा सिनेमा

ऐश्वर्या राय - सलमान खान सोबत काम केलेल्या भैरवी वैद्य यांच्या निधनाने शोककळा

Devendra Jadhav

Bhairavi Vaidya Passed Away: ऐश्वर्या राय बच्चन सोबत ताल सिनेमात काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचं निधन झालंय.

भैरवी वैद्य यांनी 8 ऑक्टोबर रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनोरंजन क्षेत्रातील त्यांची कारकीर्द एकूण ४५ वर्षांची होती. भैरवी गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या.

असंख्य चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलेल्या भैरवी वैद्य यांच्या निधनाने हिंदी इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. भैरवी यांनी अलीकडेच निमा डेन्झोंगपा या मालिकेत अभिनय केला होता या मालिकेच्या कलाकारांनीही भैरवी वैद्य यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

भैरवी यांनी ऐश्वर्या राय, अनिल कपूर, अक्षय खन्ना यांचा ताल सिनेमा गाजवला होता. याशिवाय सलमान खान सोबत चोरी चोरी चुपके चुपके या सिनेमात अभिनय केला. (Latest Marathi News)

गुजराती आणि हिंदी चित्रपटांमधील तिच्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणार्‍या, नीमा डेन्झोंगपा या टीव्ही शोमध्ये त्यांनी अलीकडे हजेरी लावली होती. याशिवाय हसरतीन आणि महिसागर अशा लोकप्रिय टीव्ही शोमध्ये त्यांचा परफॉर्मन्स आजही त्यांच्या चाहत्यांच्या स्मरणात आहे.

ऐश्वर्या राय बच्चन स्टारर ताल मधील जानकीच्या भूमिकेने भैरवीचा सिनेसृष्टी प्रवास सुरू झाला. ताल मधील त्यांच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. याशिवाय सलमान खानच्या चोरी चोरी चुपके चुपके मध्येही त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. एक चांगली आपल्यातून गेली या भावनेने अनेक कलाकार भैरवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : पुण्यात प्रेशर मिड आणि प्लाझ्मा वर बंदी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा सुरू

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT