Vetern Actress Kasammal Died
Vetern Actress Kasammal Died Sakal
मनोरंजन

Veteran Actress Kasammal Died : दारुसाठी पैसे नव्हते म्हणून मुलानं आईचा घेतला जीव! प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू

युगंधर ताजणे

Vetern Actress Kasammal Died: साऊथ चित्रपट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री कासम्माल यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मुलानं नमकोदीनं (P Namakodi) त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

तामिळनाडू पोलिसांनी आता नमकोदीला अटक केली आहे. दारुला पैसे नसल्यामुळे नमकोदीनं कासम्माल यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानं त्यांच्यात भांडणं सुरु झाली. ती भांडणे टोकाला जाऊन रागाच्या भरात नमकोदीनं त्याची आई अभिनेत्री कासम्माल यांची हत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. फ्री प्रेस जर्नलनं याबाबत वृत्त दिलं आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी नमकोदीला अटक केली असून त्याच्याकडून काही वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. मीडियातून ज्या बातम्या समोर आल्या आहेत त्यातून ५२ वर्षीय नमकोदीनं आपल्या आईवरच जीवघेणा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना तामिळनाडूतील मदुरे शहराजवळील उसिलामपट्टी येथे घडली. पोलिसांनी आता नमकोदीला जेरबंद केलं आहे.

नमकोदीनं आई कासम्माल यांच्याकडे दारुसाठी पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांच्यात भांडणं सुरु झाली. त्याचवेळी त्यानं आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. नमकोदी आईला मरेपर्यत मारहाण करत होता. न्यूज १८ ने दिलेल्या माहितीनुसार, लाकडाच्या साह्यानं नमकोदीनं आईला मारहाण केली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला. असं म्हटलं जातं की, नमकोदी हा नेहमीच दारुसाठी कासम्माल यांच्याकडे पैशांची मागणी करत असे. त्यावरुन त्यांच्यात भांडणं होतं असत.

कासम्माल यांच्याविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी तमिळ चित्रपट ‘Kadaisi Vivasayi’ यामध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. तो चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात विजय सेतुपति आणि योगी बाबू यांची महत्वाची भूमिका होती. एम मनिकंदानी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये कासम्माल यांनी विजयच्या आईची भूमिका साकारली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT