Vatsala Deshmukh 
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचं निधन

'पिंजरा' चित्रपटात त्यांनी अभिनेत्री संध्या यांच्यासोबत खलनायिकेची भूमिका साकारली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : पिंजरा (Pinjara Movie) या गाजलेल्या मराठी चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख (Vatsala Deshmukh) यांचं निधन झालं आहे, वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे कुटुंबात सध्या नातसून आणि नातू हे आहेत. दिवंगत प्रसिद्ध अभिनेत्री संध्या यांच्या त्या मोठ्या बहिण होत्या तर दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या. संध्या आणि वत्सला यांनी पिंजरा सिनेमात एकत्र काम केलं होतं. (Veteran actress Vatsala Deshmukh passes away)

वत्सला देशमुख यांनी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. राक्षसी महत्वकांक्षा, सौदामिनी, बेबंदशाही, रायगडाला जेव्हा जाग येते आदी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. तसेच चित्रपटांमध्ये त्यांनी आई, काकू, मावशी अशा प्रकारच्या भूमिका केल्या. तुफान और दिया, नवरंग, जलबीन मछली नृत्यबिन बिजली, लडकी सह्याद्री की या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. तसेच पिंजरा, बाळा गाऊ कशी अंगाई, ज्योतिबाचा नवस अशा मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT