veteran classical singer prabha atre passed away at pune
veteran classical singer prabha atre passed away at pune  SAKAL
मनोरंजन

Prabha Atre Death: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रेंचं निधन, संगीतविश्वातला तारा निखळला

महिमा ठोंबरे

Prabha Atre Passed Away News: प्रभा अत्रे यांचं दुःखद निधन झालंय. त्या किराणा घराण्यातील भारतीय शास्त्रीय गायिका होत्या. त्यांना भारत सरकारचे तीनही पद्म पुरस्कार मिळाले आहेत. आज पुण्यात ९२ व्या वर्षी त्यांचं निधन झालंय.

शनिवारी पहाटे त्यांचं निधन झाले. डॉ. अत्रे यांना पहाटे श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना रूग्णालयात घेऊन जात होते. त्यावेळी वाटेतच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे वडील आबासाहेब तर आई इंदिराबाई अत्रे. लहानपणापासूनच प्रभा यांना संगीताची आवड होती.

वयाच्या ८ व्या वर्षी मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी संगीताचे काही धडे घेतले. आणि तिथुनच प्रभा यांचा संगीतमय प्रवास सुरु झाला.

प्रभा यांनी गुरुशिष्य परंपरेत संगीताचे शिक्षण घेतले. किराणा घराण्यातील सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. गायनासोबतच त्यांनी कथ्थक नृत्याचे सुद्धा प्रशिक्षणही घेतले होते.

संगीताचे शिक्षण घेत असतानाच अत्रे यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी संपादन केली. नंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमधून एलएलबी पूर्ण केले.

प्रभा यांनी गांधर्व महाविद्यालय मंडळ, याशिवाय ट्रिनिटी लबन कॉन्झर्वेटोअर ऑफ म्युझिक अँड डान्स, लंडन (वेस्टर्न म्युझिक थिअरी ग्रेड-IV) येथेही शिक्षण घेतले आहे. नंतर त्यांनी संगीतात पीएचडीही मिळवली.

प्रभा यांना भारत सरकारचे पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. प्रभा यांच्या निधनाने संगीतविश्वातला एक तारा निखळला, अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! टोल नाक्यावर 160 रूपयांसाठी वाद; महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर चढवली कार अन्...VIDEO VIRAL

IPL 2024 Playoffs : प्लेऑफच्या शर्यतीतून 3 संघ बाहेर, 1 क्वालिफाय, 'या' 6 संघाचे मालक टेन्शनमध्ये

घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेत मृतांच्या संख्येत वाढ, 74 जखमींना वाचवण्यात यश

Weather Updates: यंदा मान्सून कधी होणार दाखल? मान्सूनबाबत हवामान विभागाने दिली माहिती, अंदमानमध्ये 'या' तारखेला एन्ट्री

मोठी बातमी! अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार भरपाई; काय आहे योजना, कोठे करायचा अर्ज; राज्यात सोलापुरातून पहिली शिफारस

SCROLL FOR NEXT