Ravindra Berde Passed Away  
मनोरंजन

Ravindra Berde Passed Away : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांच निधन; 78व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रोहित कणसे

मराठी सिनेसृष्टीत आपल्या भूमिकांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने ते त्रस्त होते. काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

रविंद्र बेर्डे यांची अजून एक ओळख म्हणजे ते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत देखील त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. यांच्यावर मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान मागील दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयायातून घरी सोडण्यात आले होते.

घरी आल्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. वयाच्या विसाव्या वर्षी ते 1965 मध्ये रंगभूमीवर पदार्पण खेलं. 300 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.

अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्यासोबत रवींद्र बेर्डे यांची जोडीला पडद्यावर खूप प्रेम मिळालं होतं. अनेक प्रकारच्या पात्रांनी त्यांनी लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. रवींद्र मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. सिंघम, चिंगी यांसारख्या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. 1995 मध्ये नाटकाच्या रंगमंचावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर 2011 साली त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रासले.

रविंद्र बेर्डे यांनी मराठी चित्रपट आनाडी, खतरनाक, होऊन जाऊ दे, हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, उचला रे उचला, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा, हाच सुनबाई चा भाऊ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी! ११ ऑगस्टला पाणी साठवून ठेवा; 'या' भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

IND vs SLC XI Warm UP Match: गौतम गंभीरने ज्याला दुर्लक्षित केले, त्याने आज मैदान गाजवले! श्रीलंकेच्या आठ विकेट्स, भारताचे पुनरागमन

प्रशांत किशोरांची पवार कुटुंबासोबत बैठक; सुनील तटकरे अनभिज्ञ; म्हणाले, ''ते आमच्यासाठी काम करतायेत माहीत नाही''

Abhijeet Dipke: घरासमोर CID अधिकारी, 'हिट स्प्रे' ग्रुपचा दावा अन्... DCP ला थेट फोन करत अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: फ्री वायफाय वापरणं महागात पडलं! वरिष्ठ बँक अधिकाऱ्याचा फोन हॅक, भामट्यांकडून २८ मिनिटांत ४ लाखांचा व्यवहार

SCROLL FOR NEXT