sagar sarhadi
sagar sarhadi 
मनोरंजन

'चांदनी', 'कहो ना प्यार है'सारख्या चित्रपटांचे लेखक सागर सरहदी काळाच्या पडद्याआड

स्वाती वेमूल

प्रसिद्ध पटकथा लेखक, संवाद लेखक आणि दिग्दर्शक सागर सरहदी यांचं निधन झालं. फिल्म इंडस्ट्रीतील सर्वोत्तम पटकथालेखकांमध्ये त्यांची गणना होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. मुंबईतील सायन इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८८ वर्षांचे होते. रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 'कभी कभी', 'चांदनी', 'सिलसिला', 'कहो ना प्यार है' यांसारख्या चित्रपटांची पटकथा त्यांनी लिहिली होती. 

सागर सरहदी यांचा जन्म ११ मे १९३३ रोजी पाकिस्तानात झाला. एबटाबादला सोडून ते दिल्लीतील किंग्सवे कँपमध्ये राहायला आले. नंतर ते मुंबईत स्थायिक झाले. कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलं. त्यांना यश चोप्रा यांच्या 'कभी कभी' या चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात राखी आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील संवादलेखनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला होता. 'बाजार' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. यामध्ये स्मिता पाटील, फारूख शेख आणि नसीरुद्दीन शाह प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाची निर्मिती आणि लेखनसुद्धा त्यांनीच केलं होतं. 

सागर सरहदी यांनी 'नूरी', 'सिलसिला', 'चांदनी', 'रंग', 'जिंदगी', 'कर्मयोगी', 'कहो ना प्यार है', 'कारोबार', 'बाजार', 'चौसर' यांसारख्या हिट चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाद्वारे अभिनेते जॅकी श्रॉफ, दिग्दर्शक हंसल मेहता यांसोबतच इतर कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयारी होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

Accident News : पुण्यात कल्याणीनगर येथे भीषण अपघात, दोघांना चिरडले,अल्पवयीन कारचालक ताब्यात

Sharmistha Raut : "माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायचे"; घटस्फोटाच्या त्या प्रसंगावर व्यक्त झाली शर्मिष्ठा

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT