Vicky Kaushal Net Worth: Esakal
मनोरंजन

Vicky Kaushal Net Worth: एका छोट्या चाळीत जन्मलेला विकी आज आहे कोट्याधीश! किती आहे संपत्तीचा आकडा

Vaishali Patil

Vicky Kaushal Net Worth: बॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी स्वत:च्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. यात एका नावाचा आवर्जून सामावेश करावा लागेल तो म्हणजे अभिनेता विकी कौशल. विकी आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचे चाहते आणि कलाकार त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

आज जरी ऐश्वर्यात राहणारा विकी कौशल हा सर्वांना माहित आहे मात्र तो स्टंटमॅनचा मुलगा असल्याचं फार कमी लोकांना माहिती आहे . मुंबईतील चाळमध्ये जन्मलेल्या विक्की कौशलचे बालपण गरिबीत गेले आहे. 15 मे 1988 रोजी मुंबईतील चाळीत जन्मलेला विकी आज एक मोठा फिल्मस्टार आहे.

विकी कौशल हा त्याच्या टॅलेंटच्या जोरावर आज बॉलिवूडमधला स्टार बनला आहे. ' मसान ' या चित्रपटातील दमदार अभिनयाने विक्की कौशलला सर्वांनी ओळखले होते . या चित्रपटानंतर विकीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मसान नंतर सान, रमन राघन 2.0, लव पर स्कॉयर फीट, राजी, उरी: द सर्जिकल स्ट्राइक, उधम सिंह, मनमर्जियां यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

विकीने आतापर्यंत जवळपास 15 चित्रपटांमध्ये काम केले असून त्याच्या बहुतांश चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. विकी कौशलला उरीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. विकी उरीमध्ये आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसला होता.

स्टारडमसोबतच विकीची लग्झरी लाईफही बदलली आहे. आज तो करोडोंचा मालक आहे. त्याच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झाले तर, विकी कौशलची एकूण संपत्ती सुमारे 25 कोटी आहे. विकी एका चित्रपटासाठी ५ कोटी रुपये घेतो. विकी ब्रँड एंडोर्समेंटमधूनही चांगली कमाई करतो.

विकी कौशल प्रॉपर्टी व्यतिरिक्त अनेक चकचकीत आलिशान वाहने देखील आहेत. त्याकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ जीएलसी, बीएमडब्ल्यू एक्स 5 सारख्या कारचं कलेक्शन आहे.

लग्नानंतर विकीची पत्नी कतरिना कैफसोबत मुंबईतील ओबेरॉय स्प्रिंग बिल्डिंगमध्ये राहतो. विकी कौशलने 2021 मध्ये कतरिना कैफशी लग्न केले. नुकताच विकी कौशलचा आगामी चित्रपट ' जरा हटके जरा बचके'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Police ACP Vivek Bhagat : महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन भोवले, एसीपी विवेक भगत यांची पदोन्नती रोखली; सरकारचा अर्ध्या रात्री निर्णय

RBI Repo Rate: 7 ऑक्टोबरला मोठा निर्णय! FD करणाऱ्यांना मिळणार मोठा फायदा? जाणून घ्या काय बदलणार

अटक करणार नाही म्हणत १.३० लाखांची मागणी, लाच घेताना PSIला रंगेहाथ अटक; बोरिवली पोलीस ठाण्यात ACBची मोठी कारवाई

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Suryakumar Yadav: सूर्याचा मोठा 'गेम' झाला... आधी विचारलं खेळणार का, त्याने हो म्हटलं अन् निवड समितीने संघाबाहेर केलं

SCROLL FOR NEXT