vicky katrina 
मनोरंजन

"विकी कौशल करतोय कतरिनाला डेट"; अभिनेत्याचा खुलासा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने केला खुलासा

स्वाती वेमूल

गेल्या कित्येक महिन्यांपासून अभिनेता विकी कौशल Vicky Kaushal आणि अभिनेत्री कतरिना कैफ Katrina Kaif हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. या दोघांनी कधीच या चर्चांवर उत्तर दिलं नाही. मात्र आता एका अभिनेत्याने या दोघांच्या नात्याविषयी मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री सोनम कपूरचा भाऊ आणि अभिनेता हर्षवर्धन कपूर Harshvardhan Kapoor याने विकी-कतरिना डेट करत असल्याचं सांगितलं. २०१९ मध्ये एका मित्राच्या दिवाळी पार्टीत विकी आणि कतरिना पहिल्यांदा एकत्र झळकले होते. तेव्हापासून या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं. (Vicky Kaushal And Katrina Kaif Are Together Harshvardhan Kapoor confirms)

'झूम' वाहिनीवरील एका मुलाखतीत हर्षवर्धनला इंडस्ट्रीतील कोणत्या रिलेशनशिपच्या चर्चांना तो खरं मानतो, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर हर्षवर्धन म्हणाला, "विकी आणि कतरिना हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. हे खरं आहे. पण आता हे सांगितल्यावर मला कोणत्या समस्येचा सामना करावा लागेल का? माहित नाही." विकी कौशलने नुकतीच कतरिनाची तिच्या घरी भेट घेतल्याचं वृत्तंही 'ई टाइम्स'ने दिलं होतं. कतरिनाच्या इमारतीखाली पार्क केलेल्या विकीच्या कारचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

कतरिना आणि विकी यांना विविध पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या दोघांनी एकत्र पार्टी केल्याच्याही चर्चा होत्या. विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने अलिबागमधल्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले होते. तर दुसरीकडे कतरिनाने अलिबागमधील फोटो पोस्ट केले होते. कतरिनाने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये मागील काचेवर विकीचं प्रतिबिंब चाहत्यांनी पाहिलं होतं. तो फोटो व्हायरल होताच, कतरिनाने सोशल मीडियावरून तो फोटो डिलिट केला होता. कतरिनाच्या घरी झालेल्या ख्रिसमस पार्टीलाही विकीने हजेरी लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT