Bollywood Diwali Vicky Kaushal Katrina Kaif esakal
मनोरंजन

Bollywood Diwali: कतरिना कैफचं लग्नानंतरच पहिलं दिवाळी सेलिब्रेशन...

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडचंं लोकप्रिय जोडपं कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे सोबतचे फोटो नेहमीच चर्चेचा विषय असतो.डिसेंबर 2021 मध्ये ते लग्न बांधनात अडकले.लग्नानंतर त्यांची ही  पहिलीच दिवाळी एकत्र साजरी करत आहेत. त्यांच्या दिवाळी साजरा करतांनाचे फोटो त्यांनी सोशल मिडिया पोस्ट केले आहे.

कतरिना आणि विकी सध्या वैवाहिक जिवनाचा पुरेपुर आंनद घेतांना दिसताय. त्यांचा नुकताच करवा चौथ साजरा करतांनाचाही फोटो बराच व्हायरल झाला. आता कतरिना कैफने तिच्या इस्टांग्राम पेजवर विकी कौशलसोबत तिच्या पहिल्या दिवाळी सेलिब्रेशनचे काही सुंदर फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या जोडप्याचे हे फोटो चाहत्यांना खुप आवडत आहे. पिवळ्या रंगाच्या साडीत स्ट्रॅपी मेटॅलिक ब्लाउज घातले होते.  कतरिना कैफ खूपच सुंदर दिसत होती. त्यासोबत स्टेटमेंट डायमंड कानातले आणि स्टेटमेंट रिंग आणि बांगड्यांची जोडी घातली होती. त्याचबरोबर तिने न्यूड मेकअप आणि केस मोकळे सोडले होते.

तर दुसरीकडे, विकी कौशल, हस्तिदंती शेरवानीमध्ये सुंदर दिसत होता त्याचं बरोबर त्यांने मॅचिंग एम्ब्रॉयडरी जॅकेट आणि पायजामा घातला होता. विकी कौशलने त्याच्या पुजेचा फोटो शेअर करत छानसं कॅप्शन दिलयं यात त्यांन म्हंटलंय, ‘घरच्या लक्ष्मीसोबत लक्ष्मी पुजन झाले. आमच्याकडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा’.

 कतरिना तिच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट ‘फोन भूत’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये पदर्शित होणार आहे. ‘मेरी क्रिसमस’ , ‘जी ले जरा’ , आणि ‘टायगर 3’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे विकी सॅम बहादुर मध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh news: एक अनोखे गाव जिथे ३७ वर्षांपासून पोलिस ठाण्यात एकही तक्रार नाही; प्रेम आणि एकजुटीसाठी युपीमध्ये ठरत आहे आदर्श

Ajit Pawar: पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत; अजित पवार यांची ग्वाही, आजवरचे सर्वांत मोठे पॅकेज

Latest Marathi News Live Update : अमेझॉनवरून महागड्या वस्तू खरेदी केल्या, पार्सल फोडलं तर निघाला कचरा

CM Devendra Fadnavis : सुधाकरपंत परिचारकांचा भाव सेवेकऱ्याचा होता: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; परिचारकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

Virat Kohli ने सर्वांचा पोपट केला... 'ती' पोस्ट ना गौतम गंभीरसाठी होती, ना २०२७च्या वर्ल्ड कप साठी; मग नेमकं काय?

SCROLL FOR NEXT