vicky kaushal and ranbir kapoor instagram
मनोरंजन

'भावा कतरिनाची काळजी घे'; विकी-रणबीरच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

विकी आणि रणबीरचा हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय.

सकाळ डिजिटल टीम

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. बॉलिवूडच्या सध्याच्या काळातील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक म्हणजे विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) पुढील महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा आहे. यासोबतच अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) देखील लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. बॉलिवूडच्या या स्टार्सच्या लग्नाची चर्चा असताना विकी कौशल आणि रणबीर कपूरचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

विरल भयानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर विकी आणि रणबीरचे (Vicky Kaushal & Ranbir Kapoor) काही फोटो पोस्ट केले आहेत. दोघे एकमेकांशी हसत हसत बोलत असल्याचं फोटोमध्ये दिसून येतंय. विकी आणि रणबीरच्या या फोटोंवर एकापेक्षा एक अशा भन्नाट कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं, 'दोघेही एकमेकांना लग्नाबद्दल अभिनंदन करत आहेत.' तर एका चाहत्याने 'विकी टू रणबीर - भावा कतरिनाची काळजी घे' असं लिहिलं. अशा अनेक मजेदार कमेंट्स या दोघांच्या फोटोंवर केल्या आहेत.

विकी आणि कतरिना डिसेंबरमध्ये सिक्स सेन्स फोर्ट, बरवारा, राजस्थान येथे लग्न करणार असल्याची माहिती आहे. या लग्नाला बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रेटी उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या लग्नाला फराह खान, करण जोहर, झोया अख्तर आणि शशांक खेतान यांसारखे सेलेब्स हजेरी लावू शकतात. तर याआधी अशा बातम्या येत होत्या की, रणबीर आणि आलिया देखील या वर्षाच्या अखेरीस लग्न करणार आहेत. पण आता दोन्ही स्टार्स पुढील वर्षी लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT