sharvari wagh 
मनोरंजन

'विकी कौशलच्या भावाला डेट करत नाही': शर्वरी वाघचा खुलासा

बॉलीवूडची लोकप्रिय जोडी विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफचं काही दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात लग्न पार पाडलं.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडची लोकप्रिय जोडी विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफचं काही दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात लग्न पार पाडलं. राजस्थानातील एका मोठ्या हॉटेलमध्ये पार पडलेल्या या लग्नाची आठवडाभर देशभरात चर्चा होती. त्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आता विकी कौशलच्या भावाच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली आहे. त्याला एक मराठी अभिनेत्री डेट करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मराठी अभिनेत्री शर्वरी वाघनं (Sharvari Wagh) यावर्षी बंटी आणि बबली 2 (Bunty Aur Babli 2) मधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. तिच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतूकही केलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार शर्वरी वाघ ही सध्या विकी कौशलचा भाऊ अभिनेता सनी कौशलला (Sunny Kaushal) डेट करत असल्याची चर्चा आहे. ती विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाला राजस्थानातील माधवपूरला गेली होती. जेव्हा ती लग्नावरुन परतली तेव्हा सनी कौशल सोबत एअरपोर्टवर काही फोटोग्राफर्सनं त्यांचे फोटो घेतले. ते व्हायरल झाले आहेत. त्यावरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया त्यावर दिल्या आहेत. इंडिया डॉट कॉमनं दिलेल्या माहितीनुसार सनी कौशल आणि शर्वरी वाघ यांच्या डेटिंगविषयीच्या ज्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. त्या अफवा असल्याचे म्हटले आहे. शर्वरीनं देखील अशा गप्पांमध्ये काही अर्थ नसल्याचे म्हटले आहे.

शर्वरीनं सांगितलं की, आम्ही चांगले मित्र आहोत. गेल्या चार वर्षांपासून आमची मैत्री आहे. आता सध्या काही अफवा कानी आल्या आहेत. मात्र त्याच अफवाच आहेत. शर्वरी आणि सनी कौशलनं कबीर खानच्या द फॉरगॉटन आर्मी मध्ये काम केलं होतं. त्या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. यापूर्वी शर्वरीनं सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT