Vicky Kaushal latest news 
मनोरंजन

Vicky Kaushal : 'तो अभिनेता शेवटचा सुपरस्टार त्यानंतर कुणीही...'! विकी कौशलनं कुणाचं घेतलं नाव?

तो अभिनेता (Vicky Kaushal News) हा आमच्या काळातील शेवटचा सुपरस्टार....त्याच्या इतकी लोकप्रियता दुसऱ्या कुणाला मिळाली नाही.

युगंधर ताजणे

Vicky Kaushal Chhaava Movie Actor : मसान पासून वेगळी वाटचाल करणाऱ्या विकी कौशलनं बघता बघता आपल्या नावाची अनोखी ओळख प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. सध्याच्या घडीला विकी कौशल वेगवेगळ्या (Bollywood Latest News) भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आला आहे. त्याला अमाप लोकप्रियता मिळाली आहे. सध्या तो त्याच्या एका महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असून प्रमोशनच्या दरम्यान केलेलं वक्तव्य लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

त्या प्रमोशन इव्हेंटमध्ये विकीनं बॉलीवूडमधील स्टारडम आणि सुपरस्टार यावर त्याचं मत मांडलं आहे. यावेळी त्यानं त्या अभिनेत्याचं नाव घेत तोच आमच्या काळातील शेवटचा प्रचंड स्टारडम असलेला सुपरस्टार आहे. त्याचं ते विधान चर्चेत आलं आहे. विकीनं कुणाचं नाव घेतलं याची त्याच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

विकी हा सध्या त्याच्या आगामी छावा नावाच्या चित्रपटामुळे भलताच चर्चेत आला आहे. त्यात तो छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या या भूमिकेची चर्चा होताना दिसत आहे. त्याच्या व्हायरल झालेल्या फोटोला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटामध्ये विकी सोबत रश्मिका मंदानाही प्रमुख अभिनेत्री म्हणून दिसणार आहे.

विकीला एका इव्हेंटमध्ये सध्याचे स्टारडम आणि बॉलीवूडचा सुपरस्टार यांच्या विषयी विचारण्यात आले होते. यावेळी तो म्हणाला की, यात त्यानं ऋतिक रोशनचे नाव घेतले. तो म्हणाला की, तो आमच्या पिढीतील शेवटचा अभिनेता आहे ज्याच्या वाट्याला प्रचंड स्टारडम आलं आणि तो सुपरस्टार आहे. लोकप्रियतेच्या बाबत त्याची क्रेझ प्रचंड आहे.

'त्या' अभिनेत्याबाबत तो काय म्हणाला?

मला वाटतं ऋतिक हाच आमच्या काळातील शेवटचा सुपरस्टार आहे. आणि जो स्टारडमशी संबंधित आहे. मी अजून तिथपर्यत काही पोहचलो नाही. आताच्या काळात तिथपर्यत जाणं कठीण दिसते. कारण आता सगळ्या गोष्टी ट्रेंडवर अवलंबून आहेत. काही आठवड्यानंतर कुणाच्या काही लक्षात नसते.

स्टारडमकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलेल...

मला वाटते यापुढील काळात लोकांचा क्लासिक स्टारडमकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. पूर्वी त्याकडे एका वेगळ्या मानसिकतेतून पाहिले जात होते. जेवढी लोकप्रियता दिलीप कुमार, राजेश खन्ना आणि अमिताम बच्चन यांनी पाहिली आणि आता शाहरुख खान ज्या लोकप्रियतेचा अनुभव घेतो त्यात खूप फरक आहे.

आमच्या काळात तर अशी लोकप्रियता ऋतिक रोशनच्या वाट्याला आली. तो एकमेव अभिनेता होता. तो असा अभिनेता आहे की, ज्याला पाहिल्यानंतर लोकं कमालीची प्रभावित होतात. अशा शब्दांत विकीनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT