Vicky Kaushal comment on amey wagh post he play role in govinda naam mera movie sakal
मनोरंजन

Amey Wagh: मराठमोळ्या अमेय वाघवर विकी कौशल फिदा.. म्हणाला, मित्रा तुझ्यासोबत..

अभिनेता अमेय वाघ आणि विकी कौशल लवकरच 'गोविंदा नाम मेरा' या हिंदी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

नीलेश अडसूळ

Amey Wagh: मराठीतील प्रसिद्ध अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) हा त्याच्या हटके अभिनयासाठी जसा प्रसिद्ध आहे तसा तो त्याच्या परखड (Marathi Entertainment) प्रतिक्रियेसाठी देखील ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी त्याचा झोंबिवली (zombivli) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.नाटक, सिनेमा आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या अमेयनं आता मोठी मजल मारली आहे. अमेय लवकरच बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचाच एक पोस्टर अमेयने शेयर केला, त्यावर चक्क बॉलीवुड अभिनेता विकी कौशल याने कमेंट केली आहे.

(Vicky Kaushal comment on amey wagh post he play role in govinda naam mera movie)

सध्या चर्चा आहे ती विकी कौशलच्या 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटाची. विकी, कियारा आडवाणी, भूमी पेडणेकर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा एक पोस्टर नुकताच समोर आला ज्यामध्ये अमेय वाघ दिसला. हीच पोस्ट अमेयने ही शेयर केली आणि अमेयची ही भूमिका चर्चेचा विषय बनलीये. कारण अमेय बॉलीवुडमध्ये दणक्यात पदार्पण केलं आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. मराठमोळा अमेयदेखील या चित्रपटतात झळकतोय. चित्रपटात अमेय विकीच्या मित्राची भूमिका साकारत आहे. अमेयने याच चित्रपटातील एक पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये तो वकिलाच्या भूमिकेत आहे. हा पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं, 'गोविंदाचा वेडा मित्र. ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आम्ही येतोय तुम्हाला भेटायला १६ डिसेंबर ला डिस्नी प्लस हॉटस्टारवर.' अमेयच्या या पोस्टवर विकी कौशलने कमेंट केली आहे.

Vicky Kaushal comment on amey wagh post he play role in govinda naam mera movie

'मित्रा तुझ्यासोबत काम करताना मला प्रचंड आनंद मिळाला. भेटूया लवकरचं.' विकिने ही कमेंट अर्धी इंग्रजी आणि अर्धी मराठीमध्ये केली आहे. अमेयच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट कधी प्रदर्शित होतोय, याची वाट चाहते पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Crime : सायबर ठगांनी पोलिस अधिकाऱ्यालाच १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट' मध्ये ठेवले; २२ लाख उकळले अन्...

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

Ashadhi Ekadashi 2025 Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासाला बनवा पौष्टिक रताळ्याचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

Mobile Addiction : बाबा, गेम खेळू दे...नकार मिळताच मुलीने संपवल आयुष्य! कळंब हादरलं

मोठी बातमी! पहिल्या फेरीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीपर्यंत थांबावे लागणार; दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यास १३ जुलैपर्यंत मुदत

SCROLL FOR NEXT