Vicky Kaushal comment on stardom salman shahrukh hrithik esakal
मनोरंजन

Vicky Kaushal : 'सलमान, शाहरुख, ह्रतिक यांच्यासारखं तर...' स्टारडमवर विकी थेटचं बोलला!

बॉलीवूडमध्ये किंग खान शाहरुख, भाईजान सलमान खान आणि आमिर खान यांच्याविषयी कुणी जाहीरपणे बोलू शकत नाही.

सकाळ डिजिटल टीम

Vicky Kaushal comment on stardom salman shahrukh hrithik : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल सध्याचा आघाडीचा सेलिब्रेटी आहे. गेल्या दशकापासून या अभिनेत्यानं त्याच्या अभिनयानं चाहत्यांना वेडं केलं आहे. त्याचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये गर्दी करु लागले आहे. मसान पासून आपल्या करिअऱला सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्यानं बॉलीवूडमध्ये स्वताच्या नावाची वेगळी ओळख तयार केली आहे.

बॉलीवूडमध्ये किंग खान शाहरुख, भाईजान सलमान खान आणि आमिर खान यांच्याविषयी कुणी जाहीरपणे बोलू शकत नाही. त्यांच्याविरोधात बोलण्याचे धाडस केल्यास काय होते हे देखील काही सेलिब्रेटींच्या बाबत दिसून आले आहे. बॉलीवूडमध्ये या अभिनेत्यांचे चित्रपट त्याला मिळणारा प्रतिसादही प्रचंड असतो. सध्या विकीनं बॉलीवूड आणि बॉलीवूडमधील अभिनेते यांच्यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

एका मुलाखतीमध्ये विकीनं सध्याच्या घडीला बॉलीवूडमध्ये फेम मिळवणं सोपं झालं आहे. आपण स्वताची कधीच शाहरुख, सलमान आणि आमिर खानशी तुलना केली नाही. तसा प्रयत्नही केला नाही. कारण हे सेलिब्रेटींनी स्टारडम त्यांच्या मेहनतीच्या जोरावर मिळवले आहे. त्यांनी ते काही विकत घेतलेलं नाही. आताच्या घडीला परिस्थिती फारच वेगळी आहे. स्टारडम हे विकत घेता येतं हे बऱ्याचदा दिसून आले आहे.

सलमान, शाहरुख आणि ह्रतिक रोशन यांच्यासारखे स्टारडम आताच्या कलाकारांना अचिव्ह करणे खूपच अवघड आहे. आताच्या कलाकारांना सगळं काही इंस्टंट हवे आहे. त्याचा परिणाम त्याच्या करिअरवरही दिसून येतो. प्रत्येक गोष्ट प्रचंड वेगानं आणि घाईनं हवी असल्यानं संयम नावाची गोष्ट संपली आहे. स्टारडम हे काही एका दिवसात मिळणारी गोष्ट नाही. असे विकीनं यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Wimbledon 2026: यानिक सिनरचा डबल धमाका! सलग दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी, ३ तास ४६ मिनिटांचा थरारक सामना...

Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

SCROLL FOR NEXT