vicky kaushal express his feelings after wearing indian army uniform in sam bahadur teaser launch SAKAL
मनोरंजन

Sam Bahadur: भारतीय सेनेचा गणवेश परिधान करताना कसं वाटलं? विकी कौशल म्हणाला...

विकी कौशलला भारतीय आर्मीचा गणवेश परिधान केल्यावर कसे वाटले याचा खुलासा त्याने केलाय

Devendra Jadhav

विकी कौशल सध्या सॅम बहादुर सिनेमामुळे चर्चेत आलाय. विकीच्या सॅम बहादूर सिनेमाचा टीझर काल भेटीला आला. टीझरमध्ये विकीचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळालाय.

विकी कौशल सॅम बहादुर सिनेमात भारतीय सेनेचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत झळकत आहे. त्यानिमित्ताने विकीने त्याला आलेला अनुभव सर्वांसोबत शेअर केला.

(vicky kaushal express his feelings after wearing indian army uniform in sam bahadur teaser launch)

विकी कौशल सॅम बहादुरच्या टीझर लॉंचवेळी भावना व्यक्त करताना म्हणाला, "भारतीय लष्कराचा गणवेश परिधान करणे आणि सॅम माणेकशॉ यांची नेम प्लेट लावणे ही मोठी जबाबदारी आहे. या संपूर्ण प्रक्रियेत ADGPI (अतिरिक्त महासंचालनालय जनरल ऑफ पब्लिक इन्फॉर्मेशन) आणि भारतीय लष्कराने पूर्ण सहकार्य केले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

विकी कौशल पुढे म्हणाला, "जेव्हाही मी भारतीय सेनेला भेटायचो तेव्हा ते नेहमी म्हणायचा, 'योग्य पद्धतीने काम कर, आमचा सॅम शूर माणूस होता.' त्यामुळे नेहमीच काही ना काही दडपण असायचे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. आम्ही खरोखर कठोर परिश्रम केले आहेत. जेव्हा तुम्ही सॅन माणेकशॉ यांचा गणवेश परिधान करता तेव्हा अभिनेता म्हणून तुमची जबाबदारी वाढते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT