vickyamruta 
मनोरंजन

विकी कौशल आहे अमृता खानविलकरच्या डान्सचा फॅन

सकाळवृत्तसेवा

अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच धर्मा प्रॉडक्शनच्या राझी सिनेमात आपल्याला दिसणार आहे. या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान बॉलीवूड अभिनेता विकी कौशल हा अमृता खानविलकरचा फॅन असल्याचा उलगडा अमृताला झाला.

अमृता खानविलकर म्हणते, “मी आणि विकी ‘राझी’च्या संहिता वाचनासाठी भेटलो होतो. त्यानंतर चित्रीकरणाला सुरूवात झाल्यावर आमची मैत्री झाली. पटियालाच्या शुटिंगच्यावेळी एकेदिवशी विकीला ‘वाजले की बारा’ हे माझंचं गाणं असल्याचा उलगडा झाला. त्याला हे गाणं माहित होतं, आवडतंही होतं. पण या  गाण्यावर मीच डान्स केलाय, हे माहित नसल्याने त्याला आश्चर्याचा धक्का बसला होता.”

अमृता पूढे सांगते, “मला आजही आठवतंय, तो धावतंच माझ्याकडे आला. आणि त्याने मला तो माझा फॅन असल्याचं सगळ्यांसमोर सांगितल्यावर मला हसूच फुटलं. विकी कौशल?.... आणि माझा फॅन?... खरंतर मसान चित्रपट पाहून मी त्याची फॅन झाले होते...  पण विकी सुध्दा तेवढ्यावरच थांबला नाही. त्यादिवशी आमचं शुटिंग संपल्यावर रात्री ‘वाजले की बारा’ गाण्यावर आम्ही दोघंही खूप नाचलो.”

अमृता म्हणते, “दरवर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवशी माझ्या आवडत्या डान्सरबद्दल मला विचारलं जातं. पण यंदाच्या ‘डान्स डे’ला मी फिल्म इंडस्ट्रीमधल्या कोणाची तरी आवडती नर्तिका आहे, ह्याचा मला आनंद वाटतो आहे. आणि अशी शाबासकी मग मला अजून चांगलं काम करायला प्रोत्साहित करते.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmers Protest : चांदवडमध्ये कांद्याचा उद्रेक! ३००० रुपये हमीभावासाठी सोमवारपासून शेतकरी उपोषणाला बसणार

एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाला कविता मेढेकरांनी दिलेला नकार ! "माझा रोलच नसेल.."

Latest Marathi News Live Update : मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’बाबत मुख्यमंत्र्यांकडे मिलिंद नार्वेकरांची महत्त्वाची मागणी

Mumbai-Goa Highway : अखेर दिलासा! मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पूल एका मार्गिकेवर खुला; खड्डेमुक्त प्रवासाला सुरुवात

Kasheli Tourism : कशेळी पर्यटकांच्या पसंतीस; पण सुविधांची वानवा; रस्ते, स्वच्छतागृहांसह सुरक्षारक्षकांची गरज, प्रशासनाच्या कार्यवाहीकडे लक्ष

SCROLL FOR NEXT