From Vicky Kaushal-Katrina Kaif to Priyanka Chopra-Nick Jonas Bollywood stars who got married in Rajasthan  Esakal
मनोरंजन

Parineeti Raghav Wedding: प्रियंका ते कतरिना ! परिणीती-राघवपूर्वी राजस्थानमध्ये 'या' कलाकारांनी बांधली लग्नगाठ!

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि नेते राघव चड्ढा यांचा विवाह राजस्थानमधील उदयपूरमध्ये होणार आहे. याआधीही अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत ज्यांनी राजस्थानमध्ये लग्न केले आहे.

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांचे लग्न सध्या चर्चेत आहे. 24 सप्टेंबर रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये ही दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. उदयपूरच्या शाही लीला पॅलेसमध्ये हे जोडपे लग्न करणार आहे. मात्र केवळ राघव आणि परिचं नाही तर अनेक बॉलिवूड स्टार्स आणि प्रसिद्ध सेलिब्रिटींनी देखील राजस्थानमध्ये लग्न केले आहे.

अशाच काही बॉलिवूड स्टार्सबद्दल जाणुन घेऊया ज्यांनी उदयपूरमध्ये लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केली.

रवीना टंडन- अनिल थडानी

2004 मध्ये रवीना टंडनने प्रसिद्ध चित्रपट वितरक अनिल थडानीशी शाही थाटात लग्न केले. उदयपूरच्या शिव निवास पॅलेसमध्ये तिने अनिलसोबत लग्न केलं. या लग्नात करोडो रुपये खर्च करण्यात आले. यावेळी मेवाडच्या शंभर वर्ष जुन्या राणीच्या पालखीतून रवीनाला मंडपात आणण्यात आलं होतं.

सिद्धार्थ मल्होत्रा - कियारा अडवाणी

बॉलीवूडचे सुपरहिट जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी यावर्षी म्हणजेच फेब्रुवारी 2023 मध्ये राजस्थानमधील जैसलमेर येथे लग्न केले. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये मोठ्या थाटामाटात या जोडप्याचे लग्न केले.

कॅटरिना कैफ- विकी कौशल

कॅटरिना कैफने 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमध्ये विकी कौशलसोबत लग्न केले. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील फोर्ट बरवाडा येथे दोघांनी लग्न केले.

प्रियांका चोप्रा -निक जोनास

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे बॉलिवूडमधील सर्वात लाडके जोडपे आहेत. निक आणि प्रियांकाचे लग्न 2018 मध्ये राजस्थानमधील उदयपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये झाले. या जोडप्याने हिंदू रितीरिवाजांसोबतच ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले.

नताशा स्टॅनकोविक- हार्दिक पांड्या

अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या यांचे लग्न फेब्रुवारी 2023 मध्ये उदयपूरमधील हॉटेल रॅफल्समध्ये झाले. पहिल्या दिवशी ख्रिश्चन परंपरेनुसार तर दुसऱ्या दिवशी त्यांनी पारंपरिक हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले.

नील नितीन मुकेश- रुक्मिणी सहाय

प्रसिद्ध गायक मुकेश यांचे नातू नील नितीन मुकेशने फेब्रुवारी 2017 मध्ये रुक्मिणी सहायसोबत राजस्थानमधील उदयपूर येथील रॅडिसन ब्लू पॅलेसमध्ये लग्न केले. या शाही लग्नाला अभिनेता राजीव कपूर आणि ऋषी कपूर यांच्यासह अनेक चित्रपट सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

श्रिया सरन-आंद्रेई कोस्चिव

'दृश्यम' फेम श्रिया सरन हिने टेनिसपटू आंद्रेई कोस्चिवसोबत लग्न केले आहे. 2018 मध्ये, श्रिया आणि आंद्रेईने त्यांच्या जवळच्या मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत उदयपूरमध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने 2018 मध्ये उदयपूरमध्ये पिरामल इंडस्ट्रीजचे मालक आनंद पिरामल यांच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

स्मृती इराणी यांची मुलगी शानेल इराणी आणि अर्जुन भल्ला यांचा विवाहही राजस्थानमध्ये पार पडला. राजस्थानमधील खिमसर किल्ला आणि पॅलेसमध्ये दोघांचे लग्न झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT