Vicky Kaushal On Animal and Sam Bahadur Clash Esakal
मनोरंजन

Vicky Kaushal: रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'ला नडणार 'सॅम बहादूर'! विकीनं अखेर मौन सोडलं,..

विकी कौशल सध्या त्याच्या सॅम बहादूर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर शुक्रवारी लाँच करण्यात आला

Vaishali Patil

Vicky Kaushal On Animal and Sam Bahadur Clash: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड सिनेमांची हवा आहे. ज्यात शाहरुख खानचा जवान , फुकरे, 'मिशन राणीगंज' हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करत आहेत. येत्या दोन महिन्यात बॉलीवूडच्या बड्या स्टार्सचे चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत.

त्यात आता विकी कौशलचा चित्रपट सॅम बहादूर आणि रणबीर कपूरचा अ‍ॅनिमल हा सिनेमा देखील एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर रिलीज होत आहे. रणबीर आणि विकी दोन्ही चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. आता या दोन्ही सिनेमात कोणता चित्रपट बाजी मारतो हे पहावं लागेल तर दुसरीकडे विकी कौशलने या स्पर्धेबाबत मौन सोडले आहे.

विकी कौशल सध्या त्याच्या सॅम बहादूर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर शुक्रवारी लाँच करण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान मिडियाशी बोलतांना विकीने रणबीरच्या अॅनिमलसोबतच्या स्पर्धबाबत प्रतिक्रिया दिली.

यावेळी विकी म्हणाला की मला वाटते की, 1 डिसेंबरच्या शुक्रवारी मी आणि रणबीर आमचे दोघेही चित्रपट प्रेक्षकांच्या हाती देऊ. आमच्यापेक्षा हा प्रेक्षकांचा दिवस असेल.

आजच्या युगात आपण एक इंडस्ट्री म्हणून प्रेक्षकांना एकाच दिवसात अनेक चित्रपटांचा पर्याय दिले पाहिजे. आपल्याकडे एका वर्षात अनेक आठवडे असतात, पण एक इंडस्ट्री म्हणून आपण वर्षभरात इतके चित्रपट बनवण्यापुरते मर्यादित राहू शकत नाही. आम्हाला अनेक चित्रपट बनवायचे आहेत आणि आमचे अनेक चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होतील.

यासोबत पुढे विकी म्हणाला की, तो रणबीरच्या अॅनिमलसाठी खुप उत्साहित आहे. प्रेक्षकांना चित्रपट आवडले तर दोन्ही चित्रपट चालतील. प्रेक्षकांसाठी तो दिवस खूप छान असेल कारण आम्ही त्याच्यासाठी काम करतो, एकमेकांसाठी नाही.

विकीच्या सॅम बहादूर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, दिग्दर्शन मेघना गुलजार यांच्या या चित्रपटात सान्या मल्होत्रा ​​सॅमची पत्नी सिलूच्या भूमिकेत दिसत आहे. तर फातिमा सना शेख इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसली आहे. नीरज काबी हे जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत असतील. रणबीरचा अॅनिमल आणि सॅम बहादूर 1 डिसेंबरला रिलीज होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT