vicky 
मनोरंजन

विकी कौशलने केला लॉकडाऊनचा भंग? हैराण झालेल्या विकीने दिली अशी प्रतिक्रिया..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे.. अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही.. मात्र वारंवार सूचना दिल्या जात असताना देखील काही लोक लॉकडाऊन तोडण्याशिवाय राहत नाहीयेत..याच दरम्यान अभिनेता विकी कौशनले देखील लॉकडाऊनचा भंग केल्याची बातमी वा-यासारखी पसरली..मात्र सोशल मिडियावर होत असलेल्या या चर्चांवर अखेर विकीने स्वतः प्रतिक्रिया देत या वादविवादावर पडदा टाकलाय..

विकी कौशलने नुकतंच ट्वीट करुन स्पष्ट केलं की त्याच्याबाबतीत लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केल्याच्या ज्या बातम्या पसरत आहेत त्या चुकीच्या आहेत..त्याचं झालं असं की विकी कौशलबाबत अशा बातम्या यायला सुरुवात झाली होती की त्याने लॉकडाऊनचं पालन केलं नाही आणि त्यामुळे त्याला पोलिसांनी पकडलं..यावर विकीने त्याच्या चाहत्यांना विनंती केली आहे की, कृपा करुन तुम्ही अफवांवर विश्वास ठेऊ नका..

विकीने यावर त्याची प्रतिक्रिया देत ट्वीटवर लिहिलं होतं की, ''मी लॉकडाऊन पाळला नाही आणि मला पोलिसांनी पकडलं. हा अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मी माझ्या घराबाहेर पाऊलही टाकलेलं नाही.. मी लोकांना विनंती करतो की कृपया त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका.'' या ट्वीटमध्ये विकीने मुंबई पोलिसांना देखील टॅग केलं आहे..

विकीच्या या ट्वीटवर त्याचं समर्थन करणा-.या अनेकांच्या सकारात्मक आणि विकीला पाठींबा देणा-या कमेंट्स पाहायला मिळाल्या आहेत..सांगायचं झालं तर विकीच्या सोसायटीमध्ये कोरोना पॉझिटीव्ह केस समोर आली आहे..

विकी मुंबईमधील ऑबेरॉय स्प्रिंग्स कॉम्प्लेक्समध्ये राहतो..या प्रसिद्ध इमारतीच्या ए विंगमध्ये कोरोना व्हायरची केस आढळून आली आहे आणि ही इमारत सील केली गेली आहे..विकी व्यतिरिक्त या इमारतीच्या तीन्ही विंग्समध्ये एकुण १६ बॉलीवूड सेलिब्रिटी राहतात..ज्यात चित्रांगदा सिंह, चाहत खन्ना, अहमद खान, सपना मुखर्जी, राजकुमार राव-पत्रलेखा, राहुल देव-मुग्धा गोडसे, कृष्णा अभिषेक-काश्मीरा शहा, नील नितीन मुकेश, आनंद एल राय, अर्जन बाजवा, विपुल शहा आणि प्रभुदेवा यांचा समावेश आहे..  

vicky kaushal violates the lockdown reacted on twitter  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT