Vidhu Vinod Chopra Son agni chopra century in the first match of Ranji 12th fail  SAKAL
मनोरंजन

Vidhu Vinod Chopra Son: रणजीच्या पहिल्याच सामन्यात शतक! विधू विनोद चोप्रा यांच्या मुलाची शतकी कामगिरी

१२th फेल फेम विधू विनोद चोप्राच्या लेकाने क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली

Devendra Jadhav

Vidhu Vinod Chopra Son News: बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या '12वी फेल' चित्रपटाचे यश साजरे करत आहेत. दरम्यान विधू विनोद चोप्रा हे वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत.

विधू यांचा मुलगा अग्नीने क्रिकेटच्या खेळात कमाल केली आहे. अग्निने रणजी ट्रॉफीमध्ये शानदार पदार्पण केले आहे. सिक्कीमविरुद्ध खेळताना त्याने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले.

रणजी ट्रॉफीमध्ये मिझोरामकडून खेळताना अग्नी चोप्राने हा पराक्रम केला. मिझोरामला विजय मिळाला नसला तरीही अग्नी चोप्राचे सर्वत्र कौतुक होत आहे. अग्निने रणजी सामन्यात एकूण 258 धावा केल्या. अग्नी हा दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा आणि अनुपमा चोप्रा यांचा मुलगा आहे.

अग्नीने मिझोरामकडून खेळताना सिक्कीमविरुद्धच्या पहिल्या डावात 179 चेंडूत 166 धावांची चमकदार खेळी खेळून क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. अग्नीने आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवत दुसऱ्या डावात 74 चेंडूत 92 धावा केल्या. सिक्कीमच्या पहिल्या डावातील 442/9 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना, मिझोरामने पहिल्या डावात केवळ 214 धावा केल्या, त्यापैकी अग्नीने 75 टक्क्यांहून अधिक धावा केल्या.

२५ वर्षीय अग्नी हा डाव्या हाताचा फलंदाज आहे. अग्नी चोप्राने मुंबईच्या ज्युनियर संघातून आपल्या करिअरची सुरुवात केली. नंतर तो मिझोरामच्या दिशेने वळला.

सय्यद मुश्ताक ट्रॉफीसाठी पदार्पण केल्यानंतर, त्याने एका महिन्यानंतर चंदीगडविरुद्ध विजय हजारे ट्रॉफीमध्ये लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. आता रणजी ट्रॉफीमध्ये अग्नीने पहिल्याच सामन्यात शतक झळकावून शानदार सुरुवात केली आहे.

विधू विनोद चोप्रा यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, '12th फेल' च्या आधी त्यांनी पीके, मुन्नाभाई एमबीबीएस, शिकारा, मिशन काश्मीर आणि संजू सारखे प्रसिद्ध चित्रपट केले आहेत.

गेल्या वर्षी २०२३ मध्ये त्यांनी अत्यंत कमी बजेटमध्ये '12th फेल' बनवला, जो बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. यामध्ये विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन 53.88 कोटी रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT