vidya balan new movie do aur do pyaar announcement with pratik gandhi illeana d cruz  SAKAL
मनोरंजन

Do Aur Do Pyaar: विद्या बालनचा नवीन सिनेमा, 'स्कॅम 1992' अभिनेत्यासोबत करणार रोमान्स

विद्या बालनच्या नवीन रोमँटिक कॉमेडीची घोषणा झालीय

Devendra Jadhav

Vidya Balan Do Aur Do Pyaar News: विद्या बालनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विद्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचं नाव आहे दो और दो प्यार.

या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक आज रिलीज करण्यात आला असून त्याची रिलीज डेटही समोर आली आहे.

विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना आणि सेंधील राममूर्ती यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'दो और दो प्यार' चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

या चित्रपटाचे निर्माते अॅप्लॉज एंटरटेनमेंट आणि इलिपसिस एंटरटेनमेंट आहेत. निर्मात्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून फर्स्ट लुक जारी केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहीले आहे, 'मे लव्ह सरप्राइज यू, कन्फ्युज यू इन द सीझन'!

विद्या बालन आणि इलियाना डिक्रूझ यांनी अलीकडेच त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांसाठी एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट 'दो और दो प्यार' चित्रपटासंबंधी होती हे स्पष्ट झालंय.

हा चित्रपट 29 मार्च 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पोस्टरमध्ये विद्या बालन सेंधिलच्या प्रेमात दिसणार आहे. तर इलियाना अभिनेता प्रतीक गांधीच्या प्रेमात दिसणार आहे. पण विद्याचा हात प्रतीकच्या हातात आहे.

दो और दो प्यार हा चित्रपट श्रीशा गुहा ठाकुरता यांनी दिग्दर्शित केला आहे. हा त्यांचा डेब्यू चित्रपट आहे. हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झालेल्या 'द लव्हर्स' या परदेशी चित्रपटाच्या कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर भाष्य करण्यात आले आहे.

विद्या बालनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी ती 'नियत' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट 7 जुलै 2023 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे विद्याचा चार वर्षांनी थिएटरमध्ये सिनेमा झळकतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT