मनोरंजन

'अलार्म काकां'नी दिग्गजांना शिकवला होता अभिनय

मोती साबणाच्या जाहिरातीतील आजोबांविषयी बरंच काही..

स्वाती वेमूल

उठा उठा पहाट झाली, मोती साबणाची वेळ झाली..

दिवाळीतील ही जाहिरात अनेकांना चांगलीच लक्षात असेल. या जाहिरातीवर अनेक मीम्सदेखील तयार झाले. पण गेली अनेक वर्षे, या जाहिरातीने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. याच जाहिरातीतील आजोबा विद्याधर करमरकर Vidyadhar Karmarkar यांचं निधन झालं. ते ९६ वर्षांचे होते. मोती साबणाच्या जाहिरातीतील 'उठा उठा पहाट झाली..' या त्यांच्या तोंडी असलेल्या डायलॉगमुळे त्यांना 'अलार्म काका' म्हणूनही ओळखलं जात होतं. विद्याधर हे अनेक जाहिरातींमध्ये झळकले होते. विद्याधर यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. Vidyadhar Karmarkar Death

दिवंगत अभिनेते बलराज सहानी यांच्यासोबत विद्याधर यांनी नाटकांतून कामं केली आणि त्यांच्याच प्रेरणेने कठपुतळीची कला त्यांनी जोपासली. कळपुतली या हिंदी चित्रपटातील एका गाण्यात त्यांनी आपल्या हातांनी कठपुतळ्या नाचवल्या होत्या. इतकंच नव्हे तर प्रसिद्ध 'जहाँ मै जाती हूँ वही चले आते हो' या गाण्यातील कठपुतळ्यांची कमालसुद्धा विद्याधर यांचीच होती. 'इंडियन पपेट थिएटर'च्या माध्यमातून त्यांनी देशभरात कळपुतळीची कला दाखवली.

विद्याधर यांनी अभिनेते संजीव कुमार, अभिनेत्री सायरा बानो यांनासुद्धा अभिनयाचे धडे दिले होते. अभिनयासोबतच त्यांनी लेखनसुद्धा केलं होतं. विविध वर्तमानपत्रे, मासिके यांच्यासाठी ते नियमितपणे लेखन करायचे. विशेष म्हणजे सेंट्रल टेलिग्राफ ऑफसमधील नोकरी करत हे अभिनयाचा छंद जोपासायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतर आज देशात नवे इंधन दर जाहीर! आता 1 लिटर पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Lionel Messi: दुखापतीनंतर मेस्सी मैदानावर उतरण्यास सज्ज, पण चाहत्यांची धाकधूक वाढली! उद्या सकाळी ६.३० वाजता काय घडणार?

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंनी खासदारांना "जायचं असेल तर खुशाल जा" असं म्हटलेलं नाही : संजय राऊत

Nagpur: विमानतळ २५ जूनला होणार हस्तांतरित; ७ हजार कोटींची गुंतवणूक ; विदर्भासाठी ठरणार ‘गेमचेंजर’

73 व्या वर्षीही दाट केसांचं रहस्य! प्रियांका चोप्राच्या आईचा DIY घरगुती हेअर मास्क viral; पाहा कसा बनवायचा

SCROLL FOR NEXT