Vidyut Jammwal Nandita Mahtani Breakup esakal
मनोरंजन

Vidyut Jammwal : विद्युत जामवालचं 'ब्रेक अप'! ताजमहालासमोर नंदिताला केलं होतं प्रपोझ

बॉलीवूडमध्ये आपल्या स्टंटनं चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या विद्युत जामवालच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी घडामोड घडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Vidyut Jammwal Nandita Mahtani Breakup - बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल याच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं त्याची गर्लफ्रेंड प्रसिद्ध फॅशन डिझायनर नंदिता महतानीला ताजमहालाच्या साक्षीनं प्रपोझ केलं होतं. मात्र आता त्यांच्या नात्याला घरघर लागली आहे.

बॉलीवूडमध्ये आपल्या स्टंटनं चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या विद्युत जामवालच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी घडामोड घडली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या दोन्ही सेलिब्रेटींमध्ये वाद असल्याची चर्चा होती. आता व्हायरल झालेल्या बातम्यांनुसार विद्युत जामवालचं ब्रेक अप झाल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. यापूर्वी त्यांना अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं आणि विद्युतच्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं एकत्र स्पॉट केलं गेलं आहे.

विद्युत आणि नंदिता हे एकमेकांना दोन वर्षापासून डेट करत होते. त्यांच्या ब्रेक अपनं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यानं ताजमहालला भेट देत नंदिताला लग्नासाठी मागणी घातली होती. याशिवाय त्यांनी सोशल मीडियावर आपल्या नात्याविषयी जाहीर कबूली देखील दिली होती. एका न्युज इंजेन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, त्यांना वियना पांडे यांच्या मुलीच्या हळदी समारंभाला स्पॉट करण्यात आले. मात्र त्यावेळी ते एकमेकांपासून दूर होते. असं म्हटलं जात आहे की, वेगवेगळ्या पार्टीज आणि सोशल प्रोग्रॅमध्ये ते सहभागी होत नसल्यानं त्यांच्यामध्ये ब्रेक अप झाले. २०२१ मध्ये त्यांनी साखरपुडा झाल्याची घोषणाही केली होती.

विद्युत जामवाल विषयी सांगायचे झाल्यास तो बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. सध्याच्या घडीला बॉलीवूडमध्ये स्टंटसाठी त्यानं त्याची वेगळी ओळख तयार केली आहे. याशिवाय जगातील सर्वात प्रभावी अभिनेत्यांमध्ये त्याच्या नावाचा समावेश झाला आहे. अॅक्शन हिरो म्हणून विद्युतनं कमी वेळेत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT