Vidyut Jamwal Photo Controversy Social media esakal
मनोरंजन

Vidyut Jammwal Controversy : 'जर तुमचा दिवस चांगला असेल तर तुम्हाला वाघ, हरिण अन्...' वीर दासनं विद्युतला सणसणीत टोमणा

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल हा टीकेचा धनी होताना दिसतो आहे. त्याचे कारणही खास आहे.

युगंधर ताजणे

Vidyut Jamwal Photo Controversy Social media : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल हा टीकेचा धनी होताना दिसतो आहे. त्याचे कारणही खास आहे. ते म्हणजे त्यानं त्याच्या बर्थ डे च्या निमित्तानं केलेलं फोटोशुट. हे फोटोशुट चर्चेत आलं आहे. जंगलातील त्याच्या त्या एका फोटोनं तो नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे.

कित्येकांनी त्याला ट्रोल केले आहे. चाहत्यांनी त्या वेगळेपणाचं कौतुक केलं आहे.काही महिन्यांपूर्वी प्रख्यात अभिनेता रणवीर सिंगनं देखील केलेल्या न्युड फोटोशूटनं खळबळ उडाली होती. इंस्टावर त्यानं तो फोटो पोस्ट केला आणि गदारोळ झाला होता. कित्येक बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी रणवीरच्या क्रिएटिव्हीटीचे कौतुक केले होते. दुसरीकडे नेटकऱ्यांनी त्याला खडेबोल सुनावले होते. एवढेच नाहीतर कित्येक सामाजिक संघटनांनी रणवीर सिंगवर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही केली होती.

त्यानंतर विद्युतनं जंगलातील न्युड फोटोशुटनं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. यात अभिनेता आणि कॉमेडियन वीर दासनं विद्युतला चांगलाच टोमणा मारला आहे. त्यानं एक्सवर शेयर केलेली पोस्ट चर्चेचा विषय आहे. वीर हा नेहमीच त्याच्या हटके प्रतिक्रियांसाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे. यापूर्वी तो परदेशातील त्याच्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याच्यावर खूप टीकाही झाली होती.

काही रियॅलिटी शो मध्ये देखील वीर सहभागी झाला होता. त्यावरुन तो लाईमलाईटचा विषय झाला आहे. आता त्यानं विद्युतच्या त्या फोटोवर दिलेली प्रतिक्रिया विद्युतच्या चाहत्यांना काही आवडलेली दिसत नाही. वीर म्हणतो, कॉर्बेट नावाच्या जंगलात जाण्याची उत्सुकता आता वाढली आहे. जर तो दिवस चांगला असेल, आणि तुम्ही ज्या ग्रुपबरोबर आहात तो शांत असेल तर तुम्हाला वाघ दिसेल, हरिण दिसेल, काही दुर्मिळ पक्षीही दिसतील. त्यात विद्युत जामवालही दिसेल.

अशा शब्दांत वीरनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. यानंतर त्याच्या त्या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी त्याला प्रत्युत्तरही दिल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT