vidyut jammwal wedding in london with girlfriend nandita mahtani destination wedding in london SAKAL
मनोरंजन

Vidyut Jamwal Wedding: विद्युत जामवालने गर्लफ्रेंडसह गुपचुप उरकलं लग्न? चाहत्यांना सुखद धक्का

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालने गर्लफ्रेंडसह लग्न केलं असल्याची चर्चा आहे

Devendra Jadhav

सध्या बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्नाचा सीझन सुरु झालाय. काहीच दिवसांपूर्वी परिणीती चोप्राने राघव चढ्ढा सोबत लग्न केलं. आता परिणीतीनंतर विद्युत जामवाल लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जातंय.

राघव त्याची गर्लफ्रेंड नंदिता महतानीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या वर्षी २०२२ मध्ये सप्टेंबरमध्ये विद्युतने डिझायनर नंदिता महतानीसोबत साखरपुडा केला होता.

(vidyut jammwal wedding in london with girlfriend nandita mahtani)

अमर उजालाच्या बातमीनुसार, आता विद्युत आणि नंदिता यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची बातमी मिळाल्याने सर्वांना सुखद धक्का बसलाय. विद्युत आणि नंदिता या दोघांनी बरेच दिवस त्यांचे नाते गुप्त ठेवले होते. आता लवकरच या जोडप्याच्या लग्नाची घंटा वाजू शकते, अशा बातम्या जोर धरु लागल्या आहेत. दोघांच्या लग्नासंबंधी एक मोठे अपडेट समोर आले आहे.

या अहवालात म्हटले आहे की, विद्युत आणि नंदिता यांनी लंडनमध्ये गुपचुप लग्न उरकल्याची शक्यता आहे. दोघांनीही आपल्या जवळचे मित्र आणि कुटुंबीयांना ही बातमी गुप्त ठेवायला सांगितली आहे.

विद्युतने लग्नाची ही गोष्ट अत्यंत खाजगी ठेवली आहे. जर हे खरे असेल, तर हे दोघे लवकरच त्यांच्या लग्नाची जाहीर घोषणा करण्याची सर्व वाट पाहत आहेत. काही दिवसांपुर्वी दोघांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. पण आता दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्याने त्यांच्या फॅन्सना आनंद झालाय.

विद्युत जामवालने त्याची गर्लफ्रेंड नंदिता महतानीसाठी लंडनमध्ये खास लग्नसोहळा उरकला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नंदिताचे हे दुसरे लग्न आहे. तिने पहिल्यांदा उद्योगपती संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली, जो करिश्मा कपूरचा माजी पती देखील आहे.

आता विद्युत आणि नंदिताने खरंच लग्न केलंय का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नैतिकतेला तडा! बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी आता भाजपचा स्वीकृत नगरसेवक, जनतेचा संताप उसळला...

Eknath Shinde : लाडक्‍या बहिणीच बदलतील कारभारी; शिवसेना उमेदवारांसाठी नाना पेठ, कात्रजमध्ये सभा

UPSC Interview Tips: UPSC मुलाखतीत काय विचारले जाते? जाणून घ्या बोर्डचे प्रश्न आणि सोपे टिप्स

Venezuelan oil India deal: अमेरिकेची मोठी खेळी! भारताला व्हेनेझुएलाचं तेल मिळणार, पण पैसे कोणाच्या खात्यात जाणार? धक्कादायक अट समोर

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड-सोलापूर दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT