marathi serials 
मनोरंजन

'झी मराठीने खूपच मनावर घेतलेलं दिसतंय'; नव्या मालिकांवर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

झी मराठी वाहिनीवर पाच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

स्वाती वेमूल

कोरोना काळात खचलेल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अनेक वाहिन्यांनी कंबर कसली आहे. नवीन संकल्पना, नवा आशय आणि नवे कलाकार घेऊन झी मराठी Zee Marathi वाहिनीवर पाच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. झी मराठी वाहिनीवरील काही मालिकांनी अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मात्र ठराविक भागांनंतर कथेत एकसुरीपणा येत असल्याने प्रेक्षकांना या मालिका रटाळवाण्या वाटू लागल्या आहेत. याचाच परिणाम मालिकांच्या टीआरपीवर झाला. 'अग्गंबाई सूनबाई', 'देवमाणूस', 'कारभारी लयभारी' या मालिका बंद होण्याच्या मार्गावर असून त्यांच्या जागी नवीन मालिका दाखल होणार आहेत. झी मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर या नव्या मालिकांचे प्रोमो पोस्ट केले जात आहेत. या प्रोमोंवर प्रेक्षकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. 'झी मराठीने खूपच मनावर घेतलेलं दिसतंय', असं एकाने म्हटलंय. तर काहींनी 'माझा होशील ना' आणि 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिका बंद करू नका, अशी विनंती केली आहे.

कोरोना महामारीचा मोठा फटका कलाविश्वाला बसला. अटीशर्तींच्या आधारावर पुन्हा शूटिंग सुरू झाले. त्यामुळेसुद्धा आता बऱ्याच नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. झी मराठीवर पाच नवीन मालिका आणि दोन रिअॅलिटी शो येणार आहेत. यामध्ये 'ती परत आलीये', 'तुझी माझी रेशीमगाठ', 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं', 'मनं बाजिंद झालं', 'मन उडु उडु झालं' या पाच मालिका, 'मी होणार सुपरस्टार' आणि 'बिग बॉस मराठी ३' या दोन रिअॅलिटी शोजचा समावेश आहे.

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

जुन्या मालिकांच्या रटाळ कथानकावरून अनेक प्रेक्षकांनी कमेंट्स केल्या होत्या. त्यामुळे 'आता झी मराठी बघावंसं वाटणार' अशी कमेंट एकाने केली. 'शेवटी झी मराठीने स्वच्छता अभियान सुरु केलं', असं दुसऱ्याने म्हटलं. यात अनेकांनी 'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी होशील ना' या मालिका बंद करू नका अशी विनंती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Final: भारत-पाकिस्तान आशिया चषकाच्या जेतेपदासाठी भिडणार; सामना केव्हा, कुठे Live पाहता येणार?

US Flight Chaos: अमेरिकेत एकाच वेळी सर्व विमानांची उड्डाणे थांबवली! 9/11 नंतर पहिल्यांदाच अशी घटना? नेमकं काय घडलं?

IND vs NZ 5th ODI: आता 'बेस्ट प्लेअर' उतरावाच लागणार! भारताच्या Playing XI मध्ये बदल होणार, कुलदीप यादव OUT?

Latest Marathi News Live Update: शक्तिपीठ महामार्गाच्या अलाइनमेंटमध्ये बदल करा, शिंदेंच्या आमदाराची मागणी

Tiger Attack: वाघाने चिमुरड्याला जबड्यात पकडून नेले, बहीण वाचली, पाळण्यातला भाऊ दगावला; भंडाऱ्याच्या तिर्रीची घटना

SCROLL FOR NEXT