Vijay Deverakonda goes nude and bold in new poster of Liger movie  sakal
मनोरंजन

विजय देवरकोंडाचा न्यूड लूक.. 'लायगर' चित्रपटाचा पोस्टर एकदा पहाच..

बहुचर्चित 'लायगर' चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले असून चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

नीलेश अडसूळ

Vijay Deverakonda : अभिनेता देवरकोंडाची सध्या बरीच हवा आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतून आलेल्या या अभिनेत्यावर आता बॉलीवुडही फिदा आहे. सध्या तो चर्चेत आहे कारण त्याचा 'लायगर' (liger) चित्रपट कधी येणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. पण आता त्यासाठी आता फारवेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यामध्ये विजयाचा भन्नाट लुक पाहून चाहत्यांनी डोळे मोठे केले आहेत. (Vijay Deverakonda goes nude and bold in new poster of Liger movie)

या चित्रपटातून विजय देवरकोंडा बॉलिवूड पदार्पण करणार आहे. विजय देवरकोंडानं हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चाहत्यासोबत अभिनेत्री सारा अली खाननेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टर मध्ये विजय न्यूड लुक मध्ये दिसत आहे. त्याशिवाय या पोस्टरवर 'साला क्रॉसब्रिड' असं देखील लिहिलं आहे. त्यामुळे या चित्रपटाचे कथानक नेमकं काय असेल असं प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

या चित्रपटात विजय देवरकोंडा व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटातून साऊथ स्टार विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने (karan johar) केली आहे. तर पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शन केले आहे. करण जोहरने हे पोस्टर शेअर करताना हटके कॅप्शन लिहिले आहे. ‘रोज रोज ऐसे गिफ्ट नही मिलते’, असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या चित्रपटात रम्या कृष्णन, रॉनित रॉय, विशू रेड्डी, अली, माइक टायसन मकरंद देशपांडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Navy : होर्मुज पार करायची शिवरायांची जहाजे! चक्क 'या' देशात पोहचलं होतं मराठा आरमार! ३ मोठ्या ऐतिहासिक नोंदी समोर

IPL 2026: धोनी दोन आठवड्यांसाठी बाहेर गेल्यानंतर कशी असेल CSK ची प्लेइंग इलेव्हन? अश्विनची पोस्ट व्हायरल

Latest Marathi News Live Update : गोराईमध्ये 35 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Pune Police Recruitment : खाकीचं स्वप्न राहिलं अधुरंच! पुण्यात पोलिस भरतीसाठी धावताना बुलढाण्याच्या 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; शिवाजीनगर मुख्यालयातील घटना

Mango Cashew Crop : अवकाळी हवामानाचा दुहेरी फटका; गारपीट, वादळ आणि वीज कोसळल्याने शेती व उद्योग दोन्ही संकटात

SCROLL FOR NEXT