Vijay Deverakonda Google
मनोरंजन

साऊथ स्टार विजय देवरकोंडा म्हणाला,''वाट लगा दुंगा'';पहा 'लायगर'चा टीझर

लूक पाहून बॉलीवूडच्या बड्या हिरोंनी घेतला धसका तर नवल नव्हे...

प्रणाली मोरे

साऊथचे सिनेमे म्हणजे 'लार्जर दॅन लाईफ' असं केलेलं चित्रिकरण,स्टायलिश कलाकार,त्यांची लक्षात राहिल अशी हटके संवादबाजी,प्रत्येक बीट्सवर थिरकायला लावतील अशी गाणी,आपल्या डोळ्यांना ३६० डिग्रीत फिरायला लावणारी फायटिंग किंवा स्टंटबाजी असं सगळं ए-वन ठासून भरलेलं असंत. म्हणूनच तर भाषा कळली नाही तरी साऊथचा सिनेमा मोठ्या उत्साहाने पाहणारे अनेक. त्यामुळेच बॉलीवूडलाही तिथल्या कथानकाची आणि स्टार्सची भुरळ पडणं यात काही नाविन्य नाही. आजपर्यंत बॉलीवूडमध्ये रजनीकांत,कमल हासन,नागार्जुन,धनुष अशा अनेक साऊथ स्टार्सनी आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलंय. आता साऊथचा आणखी एक स्टार,हॅन्डसम हंक विजय देवरकोंडानंही दणदणीत एन्ट्री केलीय. त्याच्या 'अर्जुन रेड्डी' शाहिदचा 'कबिर सिंग' बनला अनं शाहिद रातोरात बॉलीवूडच्या नंबर वन पदावर विराजमान झाला होता. असो,असा हा 'अर्जुन रेड्डी' म्हणजे विजय देवरकोंडानं(Vijay Deverakonda) बॉलीवूडमध्ये पुरी जगन्नाथ दिग्दर्शित आणि धर्मा प्रॉडक्शन सहनिर्मित 'लायगर' सिनेमातनं पदार्पण करायचं ठरवलं अनं सर्वांनाच सिनेमाच्या फर्स्ट लूक पाहण्याचे वेध लागले.

ही प्रतिक्षा संपली कारण सिनेमाचा टीझर रीलीज झालाय बरं का. 'लायगर' सिनेमात विजय देवरकोंडाने मुंबईचा स्ट्रीट फायटर जो पुढे जागतिक दर्जाच्या एमएमए फायटरपर्यंत मजल मारतो अशी फायटरची भूमिका साकारलीय. या सिनेमाचा टीझर रिलीज झाला अनं लगोलग लाखो चाहत्यांच्या पसंतीचा मानकरी ठरला. यात विजयच्या तोंडातील 'वाट लगा दूंगा' हा डायलॉग तो टोटल मुंबईकर असल्याचा भास करवून देतोय. कारण अहो,सिनेमात तो मुंबईच्या स्लम एरियात वाढलेला मुलगा दाखवलाय. त्यामुळे टोटल बम्बय्या वाटलाच पाहिजे नाही का. या सिनेमात त्याच्यासोबत रम्या कृष्णन, रॉनित रॉय, विशू रेड्डी, अली, मकरंद देशपांडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर टायगर श्रॉफसोबत 'स्टुडंट ऑफ द इयर 2' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अनन्या पांडे या साऊथ स्टार विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

विजय देवरकोंडा यानं 'लायगर' सिनेमाचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला होता. त्याचं ट्वीट इथे जोडलेलं आहे. सिनेमाचा टीझर या व्हिडीओच्या माध्यमातनं नक्की पहा.

'लायगर' सिनेमाची टीम शूटच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यांनी दुबई, यूएस आणि लॉस वेगासमध्ये सिनेमाचे बरेचसे चित्रीकरण केले आहे. 25 ऑगस्ट 2022 रोजी हा सिनेमा सर्व भाषांमध्ये जगभरातील सिनेमाघरांमध्ये दाखल होईल. या स्पोर्ट्स ड्रामामध्ये विजय देवरकोंडा पूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. फर्स्ट लूक पाहून तरी हा साऊथ स्टार बॉलीवूडच्या भल्या भल्या हिरोंना पाणी तर पाजणार नाही ना या चर्चेला मात्र उधाण आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT