Rashmika Mandanna and Vijay Deverakonda: Easkal
मनोरंजन

Rashmika- Vijay: रश्मिका-विजय लग्नापुर्वीच रहातायत एकत्र! त्या फोटोंमुळे लिव्ह इनच्या चर्चांना उधाण...

Vaishali Patil

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda: साऊथचे सुपरस्टार रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांची जोडी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या डेटिंगच्या बातम्याही बऱ्याचदा आल्या आहेत. त्याना अनेकदा एकत्र पाहिलं जात.

त्यातच रश्मिकाच्या वाढदिवसाच्या दिवशीही तिचे फोटो व्हायरल झाले होते. त्यांच्या नात्याबद्दलच्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या बातम्या समोर येत असतात. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत अशा अफवाही पसरल्या आणि त्याच्या फोटोंनी या अफवांना अधिकच हवा दिली आहे. आता त्यातच दोघांच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

खर तर रश्मिका मंदान्नाच्या एका फोटोवरुन ती आणि विजय देवरकोंडा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर सध्या या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांना सुरुवात झाली ती नुकताच रश्मिकाने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून शेयर केलेल्या एका फोटोवरुन.

तिने स्वतःचा एक फोटो साडीतला फोटो शेअर केला मात्र फोटोत रश्मिकाला नाही तर तिच्या मागचा व्ह्यू पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना विजयची आठवण झाली. केशरी रंगाच्या साडीत रश्मिका खुपच सुंदर दिसत होती. रश्मिकाने ज्या ठिकाणी फोटो काढला आहे त्याच ठिकाणी विजयने काही दिवसांपुर्वी फोटो काढले होते.

विजयने 1 आठवड्यापूर्वी याच ठिकाणी आली होते. रश्मिका आणि विजय यांच्या फोटोमधील जागा सारखीच आहे. म्हणजे दोन्हीच्या मागे दिसणारी टेरेस एकच आहे. त्यामुळे रश्मिका आणि विजय एकत्र राहत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

त्यामुळे आता चाहते एकीकडे रश्मिकाच्या लूकचं कौतुक करत आहेत. दुसरीकडे, तिच्या आणि विजयच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. मात्र नेहमीप्रमाणे विजय आणि रश्मिका यांनी याबद्दल काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तरी दोघांचे चाहते त्याच्यासाठी खुप खुश आहेत. त्यानी लवकरच त्याच्या नात्याची अधिकृत घोषणा करावी अशी इच्छा चाहते व्यक्त करत आहेत.

दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास विजय नुकताच सामंथासोबत कुशी या चित्रपटात दिसला. हा चित्रपट 1 सप्टेंबरला चित्रपटगृहात रिलिज झाला. या चित्रपटातील विजय आणि सामंथाची जोडी प्रेक्षकांना खुपच आवडली. आत्तापर्यंत या चित्रपटाने 50 कोटींच्यावर कमाई केली आहे.

तर दुसरीकडे रश्मिका मंदान्ना रणबीर कपूर स्टारर 'अॅनिमल' चित्रपटात दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट 11 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

या चित्रपटात रणबीर व्यतिरिक्त अनिल कपूर, बॉबी देओल, शक्ती कपूर आणि तृप्ती दिमरी सारखे कलाकार आहेत. हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे.

त्याचबरोबर रश्मिकाचा पुढील वर्षी “पुष्पा 2” देखील रिलिज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Wimbledon 2026: यानिक सिनरचा डबल धमाका! सलग दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी, ३ तास ४६ मिनिटांचा थरारक सामना...

Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

SCROLL FOR NEXT