Liger movie news  esakal
मनोरंजन

Liger: टायसनने देवरकोंडाला दिल्या इंग्रजीतून शिव्या, विजय म्हणतो...

टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विजय देवराकोंडाचा आणि अनन्या पांडेचा बहुचर्चित लायगर हा आज प्रदर्शित झाला आहे. त्याचे रिव्ह्यु देखील समोर आले आहे.

युगंधर ताजणे

Liger Movie News: टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विजय देवराकोंडाचा आणि अनन्या पांडेचा बहुचर्चित लायगर हा आज प्रदर्शित झाला आहे. त्याचे रिव्ह्यु देखील समोर आले आहे. विजय हा अजुनही लायगरच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे (Tollywood Actor Vijay Deverakonda) दिसून आले आहे. या दरम्यान त्यानं काही वेगवेगळे किस्सेही शेयर केले आहेत. विजयच्या लायगरला मात्र प्रेक्षकांनी नापसंत केल्याचे रिव्ह्यु व्हायरल झाले आहे. लायगरची मोठी गोष्ट म्हणजे त्यात (bollywood news) जगप्रसिद्ध बॉक्सर माईक टायसननं (Mike Tyson) केलेली भूमिका. माईकनं विजयच्या लायगरमध्ये कॅमिओ केला आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा मोठा किस्सा विजयनं यावेळी शेयर केला आहे.

विजयनं लायगरच्या निमित्तानं बॉलीवूडमध्ये पाऊल टाकलं आहे. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाची मोठी उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे. लायगरच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यातील विजयची स्टाईल आणि बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चाहत्यांना भावले होते. यासगळ्यात लायगर स्टार विजयनं माईक टायसनसोबत एक मोठा किस्सा शेयर केला आहे. त्यात तो म्हणतो, टायसनबरोबर काम करण्याचा जेव्हा प्रसंग आला तेव्हा मला खूप भीती वाटली होती. एका प्रॅक्टिस सीनमध्ये त्यांनी मारलेला ठोसा डोकं दुखावणारा होता. ते एक आक्रमक व्यक्ती आहेत. असं आपण म्हणतो याचाही प्रत्यय मी लायगरच्या निमित्ताने घेतलाय.

माईक यांच्यासोबत एक सीन्स करत होतो. तो सीन काही मनासारखा होत नव्हता. दिग्दर्शक जगन्नाथ पुरी यांनी अनेकदा सुचना देऊनही सीनमध्ये रंगत येईना. दरम्यान माईक हे चिडले आणि त्यांनी मला इंग्रजीतून शिवीगाळ केली. मला ते कळालं. सुरुवातीला मी तर हादरुनच गेलो होतो. पण काही वेळानं माईक यांनी लगेच प्रेमानं बोलण्यास सुरुवात केली. त्यांचा हा अनुभव चक्रावून टाकणारा होता. असं विजयनं सांगितलं आहे. ते काय म्हणाले हे काही मला मुलाखतीत सांगता येणार नाही. पण तो माणूस मात्र भन्नाट असल्याचे दिसून आले. मी तर त्याच्या प्रेमात पडलो असे विजयनं म्हटलं आहे.

तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही. पण टायसन यांचा आहार हा अनन्या पांडे सारखा असल्याचे म्हटले आहे. आपण त्यांना जगप्रसिद्ध बॉक्सर म्हणून ओळखतो. पण त्यांचे सगळे वेळापत्रक भन्नाट आहे. लायगरच्या निमित्तानं मी जवळून अनुभवले आहे. असेही विजयनं यावेळी सांगितले. त्याच्या लायगरची प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत होते. आज जो प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT