मनोरंजन

विजय पाटकरांसह रंगकर्मी आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

विजय पाटकर, मेघा घाडगे यांच्यासह अनेक कलाकाराचं आंदोलन

स्वाती वेमूल

मुंबईतील दादर परिसरात आंदोलन करणाऱ्या रंगकर्मींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विजय पाटकर, मेघा घाडगेसह रंगकर्मींना दादर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्रातील रंगकर्मींनी सोमवारी दादर इथं विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित होऊन मनोरंजन विश्व गेले दिड वर्ष ठप्प आहे. मानसिक तसेच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कलावंतांच्या वेदनेचा आक्रोश शासनाला कळावा यासाठी ‘रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र’ यांच्या वतीने क्रांतीदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये विजय पाटकर, मेघा घाडगे, मिलिंद दस्ताने, विनय गिरकर, संदेश उमप, उमेश ठाकूर यांच्यासह अनेक कलाकार, बॅकस्टेज कलाकार, मिमिक्री आर्टिस्ट, ऑर्केस्ट्रा कर्मचारी सहभागी झाले होते.

अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली स्व. दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाशेजारी हे आंदोलन केले गेले. अनेक रंगकर्मीनी आपल्या कलांचे सादरीकरण यावेळी केले. ‘जागर रंगकर्मींचा’ हा कार्यक्रम सादर करून कलाकारांनी आपल्या मागण्या यावेळी मांडल्या. आंदोलन करणाऱ्या विजय पाटकर, विजय राणे, मेघा घाडगे, संचित यादव, शीतल माने या रंगकर्मीना यावेळी भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नाही तसेच मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत भोईवाडा पोलिस स्टेशन बाहेरच ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा पवित्रा सर्व रंगकर्मीनी घेतला आहे.

सिनेमा, मालिका, नाटक क्षेत्रातील कलाकार तंत्रज्ञांसोबतच तमाशा, भजन, कीर्तन, भारुड, गोंधळ, जागरण, पोवाडा, लावणी, दशावतार, डोंबारी, लेझीम, वासुदेव, पोतराज, नंदीबैल, पिंगुळा, भराड इ.लोककला सादर करणाऱ्या तसेच वाद्यवृंद क्षेत्रातील १००० हून अधिक कलाकार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

काय आहेत कलाकारांच्या प्रमुख मागण्या?

कलाकार पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटींमध्ये शिथिलता आणावी. तसेच मानधनाच्या रकमेत वाढ करावी.

रंगकर्मी हा असंघटित आहे, माथाडी कामगारांच्या धर्तीवर रंगकर्मी बोर्डाची स्थापना करावी.

मुंबईत कला सादर करण्यासाठी येणाऱ्या कलाकरांना भाडेतत्वावर देण्यासाठी शासनातर्फे बांधण्यात येणाऱ्या निवासी गाळ्यांमध्ये प्राधान्याने व सवलतीच्या दरात सोय करण्यात यावी. तसेच प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी रंगकर्मींसाठी विश्रामगृहात सोय असावी.

शासनाने रंगकर्मींसाठी राखीव ठेवलेल्या म्हाडा व सिडकोच्या घरांसाठीच्या संख्येत ५% ने वाढ करावी.

निराधार वयोवृध्द रंगकर्मीसाठी शासकीय आणि खाजगी वृध्दाश्रमात प्राधान्याने व्यवस्था करावी सोबतच त्यांची जबाबदारी शासनाने घ्यावी.

महाराष्ट्रातील सरकारी तसेच नगरपालिका / जिल्हापरिषद हॉस्पिटल मध्ये रंगकर्मींसाठी राखीव 'बेड असावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

Pune Flood Alert: पुण्यात धोक्याची घंटा! एकतानगरमध्ये ४० कुटुंबांतील १०० नागरिक स्थलांतरित; मुठा नदीतील पातळीत वाढ झाल्याने पाणी घुसले

Asmita Dey won historic Gold : अस्मिता डे हिने 'Golden Score'वर जिंकले सुवर्ण! राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोपटूने इतिहास घडवला, पहिली भारतीय

India Probable Squad 2027 ODI World Cup : विराट कोहली, रोहित शर्मासह ६ खेळाडूंची जागा पक्की! २०२७च्या वन डे वर्ल्ड कपसाठी कशी असेल टीम इंडिया?

Parli Vaijnath: परळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे साकडे; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

SCROLL FOR NEXT