Vijay Sethupathi - Katrina Kaif's movie merry christmas will be released on this date radhika apte important role Esakal
मनोरंजन

Merry Christmas: विजय सेथुपती - कतरिना कैफचा सिनेमा या तारखेला होणार रिलीज, सोबत झळकणार ही मराठी अभिनेत्री

सेथुपती - कतरिनाचा मेरी ख्रिसमस सिनेमाची रिलीज डेट समोर आली

Devendra Jadhav

Merry Christmas Release Date: गेल्या अनेक दिवसांपासुन विजय सेथुपती आणि कतरिना कैफ या जोडीच्या मेरी ख्रिसमस सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. विजय - कतरिना या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

आज मेरी ख्रिसमस सिनेमाच्या रिलीज डेटचा खुलासा झालाय. मेरी ख्रिसमस सिनेमातील एक सरप्राईज म्हणजे या सिनेमात एक मराठमोळी अभिनेत्री झळकणार आहे.

मेरी ख्रिसमस मध्ये झळकणार मराठमोळी अभिनेत्री

कतरिना - विजय सेथुपतीच्या मेरी ख्रिसमस सिनेमात एक मराठमोळी अभिनेत्री झळकणार आहे. ती म्हणजे राधिका आपटे.

राधिकाने आज तिच्या सोशल मीडियावर मेरी ख्रिसमसचं पोस्टर शेअर केलंय. त्यामुळे या सिनेमात राधिका आपटे विशेष भूमिकेत झळकणार आहे

मेरी ख्रिसमस सिनेमाची रिलीज डेट आली समोर

श्रीराम राघवन दिग्दर्शित आणि विजय सेथुपती आणि कतरिना कैफ या डायनॅमिक जोडीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'मेरी ख्रिसमस' 12 जानेवारी 2024 रोजी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

२०२३ च्या डिसेंबर महिन्यात असलेल्या बॅक टू बॅक रिलीजमुळे निर्मात्यांनी मेरी ख्रिसमसची रिलीज डेट पुढे ढकलली आहे.

मेरी ख्रिसमसची उत्सुकता शिगेला

मेरी ख्रिसमस सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. या सिनेमाचं रेट्रो लूकमधील पोस्टर समोर आलंय. या पोस्टरमध्ये विजय सेथुपती - कतरिना दिसत असुन रात्रीचा गडद माहोल दिसतोय.

या सिनेमाच्या माध्यमातुन एक हटके प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. कतरिना - सेथुपती यांचा आगळावेगळा रोमान्स बघायला प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारचा आदेश निघाला! ५२ हजार २७६ शिक्षकांसाठी मोठा निर्णय, अशंत: अनुदानावरील शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर, १ ऑगस्टपासून मिळणार अनुदान

Crime: बनावट क्यूआर कोड अन् फर्म...; बनावट औषधांच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश, 'इतका' मुद्देमाल जप्त

Arjun Tendulkar चा खरंच साखरपुडा झाला आहे का? चाहत्याच्या प्रश्नावर सचिन तेंडुलकरने काय दिलं उत्तर? वाचा

Mumbai News: पावसात बेघरांची दैना! मोसमी निवाऱ्यांची कमतरता, उघड्यावर राहणाऱ्यांचे हाल सुरूच

Latest Marathi News Updates: फडणवीसांनी शिंदेंना काम करु दिलं नाही- जरांगे

SCROLL FOR NEXT