Vijay Sethupathi to play Vibhishana in Ranbir Kapoor-starrer Ramayana  SAKAL
मनोरंजन

Ramayana Movie: तिवारींच्या 'रामायणा'त विजय सेतुपतीची एन्ट्री, साकारणार ही पौराणिक भूमिका?

नितिश तिवारींच्या 'रामायण' सिनेमात साऊथ सुपरस्टार नितेश तिवारींची एन्ट्री झालीय

Devendra Jadhav

Ramayana Movie News: नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात विविध स्टार कलाकार एकत्र येत आहेत. अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका तर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी झळकणार आहे.

याशिवाय हनुमानाच्या भूमिकेत सनी देओलच्या नावाची चर्चा आहे. अशातच 'रामायण' सिनेमात साऊथ स्टार विजय सेतुपतीची एन्ट्री झालीय. विजय सिनेमात कोणती भूमिका साकारणार?

ही पौराणिक भूमिका विजय साकारणार

सध्या साऊथ स्टार विजय सेतुपती चांगलाच चर्चेत आहे. विजयचा 'मेरी ख्रिसमस' सिनेमा प्रेक्षक-समीक्षकांना चांगलाच आवडलेला दिसतोय. अशातच विजयची नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमात त्याची एन्ट्री झालीय.

नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमात विजय बिभिषणाची भूमिका साकारणार आहे. बिभिषण हा रावणाचा भाऊ होता. त्यामुळे विजयला 'रामायण' सिनेमात बघायला लोकं उत्सुक आहेत.

इंडिया टीव्हीने दिलेल्या रिपोर्टनुसार सांगण्यात आलंय की, ''नितेश तिवारींनी अलीकडेच विजय सेतुपती यांची भेट घेतली. याशिवाय स्क्रिप्टसाठी रामायणाची संपूर्ण माहिती घेतली. सिनेमाची कथा आणि व्हिज्युअल्समुळे विजयने रामायण चित्रपटात रस दाखवला होता,''

त्यामुळे 'रामायण' सिनेमाची संपूर्ण टिम आणि दिग्दर्शक नितेश तिवारी विजयला ऑनबोर्ड घेण्यास उत्सुक आहेत.

हे कलाकार रामायण सिनेमात साकारणार भूमिका

'रामायण' चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार रणबीर कपूरच्या चित्रपटात सनी देओल भगवान हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय बॉबी देओल कुंभकर्णाची भूमिका साकारणार आहे.

तर दुसरीकडे नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटात केजीएफ स्टार यश रावणाची भूमिका साकारणार असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT