Vijay Varma and Tamannaah Bhatia  Sakal
मनोरंजन

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाच्या किलर लूकवर फिदा झाला विजय वर्मा, कमेंट करत म्हणाला...

नुकताच तमन्ना भाटियाने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड इंडस्ट्रीत सतत नवीन सेलिब्रिटींच्या जोड्या तयार होत असतात. सध्या तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या अफेअरची खूप चर्चा होत आहे. डेटिंगच्या अफवांमध्ये दोन्ही स्टार्स अनेकदा एकत्र दिसले आहेत. नुकताच तमन्ना भाटियाने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विजय वर्माने या व्हिडिओवर एक प्रतिक्रिया दिली असून, या व्हिडिओकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तमन्ना भाटियाने इन्स्टाग्राम हँडलवर तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा हॉट लूक खूप आवडला असून कमेंट सेक्शनमध्ये ते तिची प्रशंसा करत आहेत. तमन्नाने हे फोटोशूट एका मासिकासाठी केले आहे. रूमर्ड बॉयफ्रेंड विजय वर्मानेही अभिनेत्रीच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे. त्याने फायर, फायर एक्सटिंग्यूशर आणि फायर ब्रिगेड इमोजी तयार केले आहेत. विजय वर्माच्या या कमेंटला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी एले पुरस्कार सोहळ्यादरम्यान तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची भेट झाली होती. या प्रसंगाचा एक व्हिडिओ इन्स्टंट बॉलिवूडने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तमन्ना भाटिया स्टायलिश ब्लू कलरच्या थाई-हाई स्लिटमध्ये सुंदर दिसत आहे. त्याचवेळी विजय वर्मा फंकी लूकमध्ये दिसत आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तमन्ना भाटिया शेवटची नेटफ्लिक्सच्या 'प्लॅन ए प्लॅन बी' चित्रपटात रितेश देशमुखसोबत दिसली होती. मधुर भांडारकरच्या 'बबली बाउन्सर'मध्येही तिने मुख्य भूमिका साकारली होती. त्याच वेळी, विजय वर्मा लवकरच 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' मध्ये दिसणार आहे, जो करीना कपूर खानचा डिजिटल डेब्यू असेल. या सिरीजमध्ये जयदीप अहलावतही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT