PS 2 Box Office:
PS 2 Box Office: Esakal
मनोरंजन

PS 2 Box Office: 'पोन्नियिन सेल्वन 2' चं बॉक्स ऑफिसवरच युद्ध सुरुच! कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला..

Vaishali Patil

PS 2 Box Office Collection: दिग्दर्शक मणिरत्नम यांचा प्रसिद्ध चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन 2' हा 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रिलिज होताच 'Ponniyin Selvan 2' या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि त्याने शानदार ओपनिंग घेतली. तर दुसरीकडे, वीकेंडनंतरही चित्रपटगृहांमध्ये चांगलीच कमाई करत आहे. याचा खुप चांगला परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये झाला.

PonniyinSelvan2  चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता हा चित्रपट लवकरच नवा विक्रम तयार करेल असं काहीस चित्र दिसत आहे. 'पोन्नियिन सेल्वन 2' चे कमाईचे आकडे समोर आले आहे.

SacNilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'Ponniyin Selvan 2' ने पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी भारतीय बॉक्स ऑफिसवर 11 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. यासोबतच चित्रपटाची एकूण कमाई 114.75 कोटींवर गेली आहे. दुसरीकडे, निर्मात्यांना या वीकेंडला चित्रपटाच्या 150 कोटींचा टप्पा पार करण्याची पूर्ण करेल अशी आशा व्यक्त होत आहे.

या चित्रपटाने यापूर्वीच देशात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे, तर चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शननेही 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Ponniyin Selvan 2 हा कल्की कृष्णमूर्तीच्या त्याच नावाच्या महाकादंबरीवर आधारित मणिरत्नमच्या दोन भागांच्या मालिकेतील दुसरा भाग आहे. पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले आणि जगभरात 500 कोटी रुपयांचे कलेक्शन नोंदवले. पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कामगिरी झाली.

हा चित्रपट तामिळ आणि हिंदीसह पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, जयम रवी आणि त्रिशा कृष्णन यांसारखे स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘मराठा आंदोलनामुळे दरदिवशी मोदींची सभा’

आपण सगळे भारतीय आहोत!

लस, गैरसमज आणि आव्हान!

Neeraj Chopra : अवघे 2 सेंटीमीटर... नीरज टॉप स्पॉटपासून थोडक्यात हुकला

जगणं शिकवणारा बापमाणूस!

SCROLL FOR NEXT