Vikram Gokhale health update still he is critical  sakal
मनोरंजन

Vikram Gokhale health update: विक्रम गोखलेंची प्रकृती पुन्हा खालावली..

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत मोठी उपडेट समोर आली आहे.

नीलेश अडसूळ

Vikram Gokhale News: मराठी - हिंदी, नाटक, चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेले अभिनेते विक्रम गोखले यांची पुन्हा प्रकृती खालावली आहे. शुक्रवार 25 नोव्हेंबर रोजी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे बोलले जात होते, पण आज रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती पुन्हा खालावली असून ते अत्यावस्थ आहेत.
(Vikram Gokhale health update still he is critical )

चार दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर काहींनी त्यांचा मृत्यू झाल्याचीही अफवा उठवली. परंतु त्यांच्यावर उपचार सुरू असून ते बरे होतील यासाठी प्रार्थना करा असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले.

शुक्रवारी म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची दिलासादायक माहिती दिली. 'त्यांच्या प्रकृतीमध्ये हळु हळु सुधारणा होत आहे. ते डोळे ही उघडत आहेत. पुढच्या ४८ तासात व्हेंटिलेटरची पण गरज भासणार नाही. तसेच बीपी आणि हृदयाची क्रिया सुरळीत सुरू आहे. ' असे मेडिकल बुलेटीनमध्ये दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क याडगीकर यांनी म्हंटले होते. याला 24 तास होत असतानाच पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

विक्रम गोखले बरे होतील अशी बाळगत असतानाच, रुग्णालयाने एक मेडिकल बुलेटीन जाहीर केलं आहे. ज्यामध्ये विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यावस्थ असून ते अजूनही व्हेंटीलेटरवर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याचेही म्हंटले आहे. या बुलेटीननंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT