Vikram Gokhale esakal
मनोरंजन

Vikram Gokhale: 'विक्रम गोखले म्हणजे....' पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

मराठी मनोरंजन विश्वात तब्बल चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे

सकाळ डिजिटल टीम

Vikram Gokhale Marathi Actor passed away: मराठी मनोरंजन विश्वात तब्बल चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून दुर्धर आजारानं त्रस्त होते. त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्यानं मराठी - हिंदी चित्रपट विश्वाला मोठा हादरा बसला आहे.

गोखले यांचे जाणे हे मराठी प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे. त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी ही कधीही न भरुन येणारी आहे. मराठी, हिंदी चित्रपट विश्वातील मोठमोठया सेलिब्रेटींनी गोखले यांना आदरांजली वाहिली आहे. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गोखले यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटूंबियांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.

मोदी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले विक्रम गोखले हे मराठी, हिंदी चित्रपट क्षेत्रातील व्हर्सेटाईल अभिनेते म्हणून त्यांचे नाव आदरानं घ्यावे लागेल, ते एक सर्जनशील अभिनेते होते. त्यांनी केलेल्या भूमिका, त्यांचे विविध रोल्स हे आपल्या कायम स्मरणात राहतील याबद्दल शंका नाही. मी त्यांच्या निधनानंतर खूप अस्वस्थ झालो आहे. मला मोठा धक्का झाला बसला आहे. मी त्यांच्या कुटूंबियाप्रती सहानुभूतू व्यक्त करतो. मोदी यांच्या त्या व्टिटलाही अनेकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT