Vikram Gokhale Esakal
मनोरंजन

Vikram Gokhale: 'तुम्ही कायम होताच आणि असालच’,शशांकची भावुक पोस्ट

सकाळ डिजिटल टीम

Vikram Gokhale pass away: मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे काल शनिवार 26 ऑक्टोबर रोजी निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोकाकुल व्यक्त करण्यात येत आहे. अनेक कलाकार आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त होत, ते कोणासाठी विक्रम हे भाऊ कुणासाठी सर तर कोणासाठी काका होते. मराठी चित्रपट सृष्टितील अनेक कलाकार त्यांनी आदर्श मानायचे. होते अशीच एक भावनिक पोस्ट अभिनेता शशांक केतकर याने केली आहे. विक्रम काकांच्या आठवणीत शशांकही भावुक झाला आहे.

त्याने लिहिले आहे की,अभिनय क्षेत्रात यायच्या आधी ऑस्ट्रेलियाला ज्यांच्या समोर पहिल्यांदा नाटकाचा प्रयोग सादर केला ते विक्रम काका. अभिनय क्षेत्रात आल्यावर ज्यांच्या बरोबर त्यांचा नातू म्हणून कालाय तस्मै नमः या मालिकेत पहिल्यांदा काम केलं ते विक्रम काका. गोष्ट तशी गमतीची च्या एका प्रयोगाला मी फक्त 15 मिनिट राहिलेली असताना थिएटर वर पोहोचलो, काका नाटक बघायला 40 मिनिट आधी येऊन बसले होते. फक्त 15 मिनिट आधी आलास? स्टार झालास का रे? असं म्हणून कान पिळणारे विक्रम काका.’

पुढे तो म्हणतो, ‘त्यांनी लिहिलेल्या 'colour called gray' या फ़िल्मच्या team मध्ये तू हवास असं म्हणणारे विक्रम काका. 2010 ते 2022 आणि त्या ही आधी... आवाज, डोळे, देहबोली, भाषा याचा वापर ज्यांच्या कडून शिकण्याचा प्रयत्न केला ते विक्रम काका. प्रत्येक माणसाला त्याच्या कामा पलीकडेही ठाम मतं हवीत हे मनावर बिंबवणारे विक्रम काका. तुम्ही कायम होताच आणि असालच’

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गोदावरी’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. त्याचबरोबर ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतही ते काम करत होते. विक्रम यांनी आजवर नाटक, मालिका, चित्रपट आणि विशेष म्हणजे बॉलीवुडमध्येही आपल्या अभिनयाचा दबदबा कायम ठेवला. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT