‘12th Fail’ submitted for Oscars: Esakal
मनोरंजन

‘12th Fail’ submitted for Oscars: '12वी फेल' ऑस्करच्या शर्यतीत सामिल! बॉक्स ऑफिसवर जमवलाय इतक्या कोटींचा गल्ला

‘12th Fail’ submitted for Oscars: अभिनेता विक्रांतने साहित्य आज तक 2023 मध्ये चाहत्यांना ही माहिती दिली.

Vaishali Patil

‘12th Fail’ submitted for OscarsL: विक्रांत मेस्सी स्टारर 12वी फेल हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटाला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता.

विधू विनोद चोप्रा आणि विक्रांत मेस्सी अभिनीत या चित्रपटाने केवळ भारतातच नाही, तर जगभरातही चांगली कमाई केली.

या चित्रपटात विक्रांत मेस्सीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलली. आता या चित्रपटाने आणखी एक कमाल केली आहे.

विक्रांत स्टारर 12 वी फेल हा चित्रपट 96 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवण्यात आला आहे. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी स्वतंत्र नामांकन देण्यात आले आहे.

अभिनेता विक्रांतने साहित्य आज तक 2023 मध्ये चाहत्यांना ही माहिती दिली.

'12वी फेल' ची कथा अनुराग ठाकूर यांनी लिहिलेल्या पुस्तकातून घेतली आहे. ज्यामध्ये IPS अधिकारी मनोज कुमार यांचा जीवन प्रवास दाखवण्यात आला आहे.

चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर चंबळमधील एका तरुणाने बारावीत नापास होऊनही आयपीएस अधिकारी बनण्याचे त्याचे स्वप्न कसे पुर्ण केले ही प्रेरणादायी कहानी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

या चित्रपटात अनंत जोशी, अंशुमन पुष्कर, मेधा शंकर आणि गीता अग्रवाल यांनीही महत्वाच्या भुमिका साकारल्या आहेत.

यंदा अनेक भारतीय स्वतंत्र चित्रपट ऑस्करला गेले आहेत. यामध्ये आर माधवनचा 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट', एसएस राजामौलीचा 'आरआरआर' आणि विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' यांचा समावेश आहे. संजय दत्तचा 'लगे रहो मुन्नाभाई' आणि भगनानीचा 'यंगिस्तान' या चित्रपटांनी देखील स्वतंत्र चित्रपट यादीत ऑस्करमध्ये एंट्री केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT