Viral Video Nana Patekar Non Veg Food serving  esakal
मनोरंजन

Video: नानांचा शेतावरच मटणाचा बेत, तांबड्या रश्श्याची चवच न्यारी!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.

युगंधर ताजणे

Nana Patekar: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. त्यात तो व्हिडिओ प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर (Viral Social Media) यांच्यासारख्या सेलिब्रेटींचा असेल तर मात्र त्याची गोष्टच वेगळी आहे. सध्या सोशल मीडियावर नाना पाटेकर यांच्या मटणाच्या तांबड्या रक (Entertainment News) रश्श्याचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी तो आपल्या फेसबूकच्या अकाउंटवरुन शेयर केला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. नाना पाटेकर (Bollywood Actor) यांनी त्या व्हिडिओमध्ये आपल्याला बऱ्याच दिवसांनी जमलेल्या सगळ्यांना जेवू घालण्याची संधी मिळाली. असे सांगत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बॉलीवूडमध्ये ज्या अभिनेत्यांना मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे अशा अभिनेत्यांमध्ये नाना पाटेकरांचे नाव आदराने घ्यावे लागते. अभिनयाच्या जोरावर नानांनी बॉलीवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांचा फॉलोअर्स मोठा आहे. नानांचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतात. नाना येत्या काळात ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची बातमी आहे. दरम्यान त्यांच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नानांचा तो व्हिडिओ राहुल देशपांडे यांनी फेसबूकवरुन शेयर केला आहे. त्यांनी तो व्हिडिओ शेयर करताना लिहिलं आहे की, मला एके दिवशी असं जगायला आवडेल. नाना तुम्हाला साष्टांग नमस्कार. जेवण अप्रतिम!”

राहुल यांनी शेयर केलेल्या त्या व्हिडिओवर नानांवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी नानांना धन्यवाद दिले आहे. नानांच्या साधेपणाचे कौतुकही केले आहे. नाना एक मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व असून त्यांच्या सहवासात आलेल्या चाहत्यांना ते नाराज करत नाही. अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहे. नाना ते नानाच त्यांची तुलना होणं शक्य नाही. असेही आणखी एका युझर्सनं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT